शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहू समाधिस्थळ मेघडंबरीचे काम पूर्ण, जोडणीची चाचणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:11 IST

सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा विलंब झाला; मात्र शिल्पकार किशोर पुरेकर यांनी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सर्व काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केला.

ठळक मुद्देशाहू समाधिस्थळ मेघडंबरीचे काम पूर्ण जोडणीची चाचणी पूर्ण

कोल्हापूर : सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत उभारण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून, तिच्या जोडणीची चाचणीही घेण्यात आली. मेघडंबरीचे काम अत्यंत किचकट तसेच कलाकसुरीचे असल्याने ते पूर्ण करण्यास थोडा विलंब झाला; मात्र शिल्पकार किशोर पुरेकर यांनी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सर्व काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केला.आपल्या अलौकिक कार्याद्वारे देशासमोर अनेक आदर्श मानदंड निर्माण करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी नर्सरी बागेत उभारण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत ही समाधी बांधली जात असून, माजी महापौर हसिना फरास व स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी त्यांच्या काळात पुढाकार घेऊन यासाठी निधी उपलब्ध करून दिला, तसेच काम पूर्णत्वाकडे जावे, यासाठी सतत आग्रह धरला होता.फरास यांची महापौरपदाची कारकिर्द संपुष्टात आल्यानंतर हे काम आठ-नऊ महिने रेंगाळले. २५ जून रोजी झालेल्या शाहूजयंतीच्या निमित्ताने त्याची चर्चा झाल्यानंतर महापौर शोभा बोंद्रे यांनी या कामात लक्ष घातले. एवढेच नाही तर त्यांनी आयुक्तांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्यासमवेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिल्पकार किशोर पुरेकर यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला.

त्यांनी मेघडंबरीचे काम कोणत्याही परिस्थितीत आॅगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करून द्या, अशी सक्त सूचना केली होती. रात्रंदिवस काम करा, काही अडचण असल्यास आमच्या कानांवर घाला, असेही त्यांनी बजावले होते. त्यानुसार पुरेकर यांनी काम आॅगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा शब्द दिला होता.शिल्पकार पुरेकर यांनी हातातील सगळी कामे बाजूला ठेवून जादा कर्मचारी मदतीला घेत सुमारे दीड टन वजनाच्या ब्रॉँझमधील मेघडंबरीचे काम गुरुवारी पूर्ण केले. त्यांनी चारीही खांबांवर ही मेघडंबरी उभी केली. त्याकरिता त्यांना क्रेनचा वापर करावा लागला. चार खांबांवर उभी राहणारी ही मेघडंबरी इटली येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्मारकाची हुबेहूब नक्कल आहे. ती ब्रॉँझची असल्याने मेघडंबरीला ऐतिहासिक बाज येण्याकरिता बरेच घासकाम करावे लागले. मेघडंबरी जोडणीची चाचणी यशस्वी झाल्याचे पुरेकर यांनी सांगितले. लवकरच प्रत्यक्ष जागेवर तिची जोडणी केली जाईल.कंपौंड वॉलचे बांधकामही लवकरच सुरूशाहू समाधिस्थळाभोवती मजबूत दगडी कुंपणाची भिंत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. समाधिस्थळाचे काम करणारे कंत्राटदार व्ही. के. पाटील यांनाच हे काम देण्यात आले आहे. सुमारे एक कोटी १० लाखांचे हे काम दगडी कोपिंग पद्धतीचे असेल. कंत्राटदारास वर्क आॅर्डर दिली असून, करारपत्र केल्यानंतर येत्या आठ दिवसांत हे कामही सुरू होईल, असे शहर उपअभियंता एस. के. माने यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर