शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

कोल्हापूर : नगररचना विभागावर भ्रष्टचाराचा आरोप, महापालिका स्थायी सभेत सदस्यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:16 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगी मिळवून देण्याकरीता वरिष्ठांच्या नावाखाली विशिष्ट कर्मचारी संबंधितांकडून २५ हजार रुपयांची मागणी करतात, असा गंभीर आरोप सत्यजित कदम यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.

ठळक मुद्देकोल्हापूर नगररचना विभागावर भ्रष्टचाराचा आरोप महापालिका स्थायी सभेत सदस्यांच्या तक्रारी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानगी मिळवून देण्याकरीता वरिष्ठांच्या नावाखाली विशिष्ट कर्मचारी संबंधितांकडून २५ हजार रुपयांची मागणी करतात, असा गंभीर आरोप सत्यजित कदम यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.

रोजरोसपणे सुरू असलेला हा भ्रष्टाचार रोखण्याकरिता २०० चौरस मीटर क्षेत्राचे अधिकार पुन्हा विभागीय कार्यालयाकडे सोपवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. नगररचना विभागातील भ्रष्टाचार, कामाची पद्धत आणि नागरिकांना होणारा त्रास यावर सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. बांधकाम असोसिएशनने सुद्धा यापूर्वी बरेच आरोप केले आहेत. येथील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक होत आहे.

याबाबत मी सहा. संचालक नगररचना यांना सांगितले तरीही त्यामध्ये काही फरक पडलेला नाही, असे कदम यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. सोयीसाठी कायदा वापरू नका. वर्षानुवर्षे फायली फिरतात. आॅनलाईन सेवाप्रणाली अजून सुरू नाही. एक खिडकीही सुरू नाही, अशा तक्रारी करतानाच अनेक वर्षे येथे तळ ठोकून असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.व्यापाऱ्यांना अग्निशमन कर लावण्याबाबत देण्यात आलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी राहुल माने यांनी केली. एकाच व्यापाऱ्याला दोन कर लावता येतात का? अशी विचारणाही त्यांनी केली.  खंडपीठ मान्यतेची प्रक्रिया अंतिम स्तरावर असून शेंडा पार्कची जागा जेवढी आवश्यक आहे तेवढी आहे का? महापालिकेच्या अखत्यारीत असलेस तातडीने नगररचना कार्यालयाने तपासणी करून जागा आरक्षित करावी लागते का, याची पडताळणी करा, अशी सूचना सभेत करण्यात आली.कदमवाडी स्मशानभूमीत फक्त तीनच कामगार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम देण्यात आले त्यांना परत स्मशानभूमीकडे पाठवा, अशी सूचना कविता माने यांनी केली. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवरील अतिक्रमणे काढलेली नाहीत. पादचाऱ्यांना चालायला जागा मिळत नाही. कनिष्ठ अभियंत्यावर त्याची जबाबदारी निश्चित करा, अशी सूचना प्रतीक्षा पाटील यांनी केली.मोकाट श्वानांवर निर्बिजीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू होईल त्यासाठी बिल्डिंग तयार झाली आहे. रेबिज व्हेक्सिनकरिता टेंडर काढले आहे. ती १५ दिवसांत उपलब्ध होईल, असे यावेळी सांगण्यात आले. ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आताच पाण्याचे नियोजन करा. ‘एक दिवस आड पाणी’ सोडण्याचे नियोजन असल्यास प्रस्ताव महासभेत ठेवा, अशी सूचना संजय मोहिते यांनी केली.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर