शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

कोल्हापूर : जिल्ह्यात थंडीची पुन्हा हुडहुडी, मॉर्निंग वॉक, दैनंदिन कामावरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:56 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवसापासून थंडीची तीव्रता थोडी वाढली आहे. कमीत कमी तापमानात घट झाली असून त्याचा परिणाम दिसत आहे. पहाटे दाट धुक्यासह अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्याने अंग गारठून जाते. गेले आठवड्यात जिल्हयात कडाक्याची थंडी जाणवत होती. मध्यंतरी दोन-तीन दिवस एकदमच अधून मधून ढगाळ वातावरण राहिल्याने थंडी थोडी कमी राहिली. पण आता हळूहळू थंडी वाढू लागली आहे.

ठळक मुद्देदोन दिवसापासून थंडीची तीव्रता वाढली दाट धुक्यासह अंगाला झोंबणारा वारामॉर्निंग वॉकवरही परिणाम

कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवसापासून थंडीची तीव्रता थोडी वाढली आहे. कमीत कमी तापमानात घट झाली असून त्याचा परिणाम दिसत आहे. पहाटे दाट धुक्यासह अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्याने अंग गारठून जाते.गेले आठवड्यात जिल्हयात कडाक्याची थंडी जाणवत होती. मध्यंतरी दोन-तीन दिवस एकदमच अधून मधून ढगाळ वातावरण राहिल्याने थंडी थोडी कमी राहिली. पण आता हळूहळू थंडी वाढू लागली आहे.सोमवारी जिल्हयातील कमीत कमी तापमान १५ डिग्री पर्यंत आले होते. त्यामुळे हुडहुडी वाढत असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे. थंडी पासून बचाव करण्यासाठी कितीही उबदार कपडे घातली तरीही अंग कुडकुडतेच.

शेती कामासाठी लवकर घराबाहेर पडताना थंडीचा त्रास होत आहे. गारठलेल्या अंगाने पिकांना पाणी पाजणे, ऊस तोडणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना घराबाहेर पडावे लागतेच.वाढलेल्या थंडीमुळे अंथरूण, पांघरूण लवकर बाहेर पडूच वाटत नाही. त्यामुळे शहरात सकाळी आठ वाजल्याशिवाय घरांचे दारही उघडलेले दिसत नाही. उशिरा उठल्याने दैनंदिन कामावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.

येत्या दोन दिवसात तापमानात थोडी वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमानात वाढ होईलच पण ढगाळ वातावरणही थोडे राहणार असल्याने थंडी कमी होण्याची शक्यता आहे.

मॉर्निंग वॉकवरही परिणामशहरात साधारणता सकाळी सहा नंतर मॉर्निंग वॉकसाठी नागरिक बाहेर पडतात. पण थंडी वाढली की वयोवृध्द नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम मॉर्निंग वॉकवर होत आहे.

जिल्ह्यातील तापमान डिग्रीमध्ये असे राहील-वार                 कमीत कमी                              जास्तीत जास्तसोमवार                    १५                                     ३०मंगळवार                  १७                                    ३१बुधवार                      २०                                    ३२गुरूवार                      १९                                   ३३ 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान