शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, आमदार जयश्री जाधवांचे विधानभवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन

By विश्वास पाटील | Updated: August 3, 2023 18:42 IST

शासनाच्या विरोधात व्यक्त केला संताप

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज विधान भवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले. हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन, अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याने जाधव यांनी संताप व्यक्त केला.कोल्हापूर शहराच्या  हद्दवाढीसाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आग्रही होते. पोटनिवडणुकीतील विजयानंतर मी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, शासन सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे.हद्दवाढीबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही, कोल्हापूरच्या बाबतीत शासनाची भूमिका दुप्पटीपणाची आहे. इतर शहरांची हद्दवाढ अनेक वेळा होते. परंतु कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून रखडलेला आहे. याकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी आज विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करत, शासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ रखडली आहे. हद्दवाढ झाली नसल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास खुंटला आहे. कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी जनभावना आहे. आणि त्यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलने केले आहे. परंतु शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ करणे गरजेचे बनले आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. या प्रस्तावास शासनाने त्वरित मंजुरी द्यावी, ही माझी न्यायीक मागणी आहे. आज केवळ विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. शासनाने त्वरित हद्दवाढ केली नाही तर भविष्यात हद्दवाढीसाठी कोल्हापूरतील जनतेसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार जाधव यांनी यावेळी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३