शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकील, पक्षकारांना न्यायालयात जाण्यास रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:16 IST

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी सर्व वकील, पक्षकारांना येथील जिल्हा न्यायालयात जाण्यापासून रोखण्याचा निर्धार खंडपीठ नागरी कृती समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री करण्यात आला. समितीचे निमंत्रक आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते.या आंदोलनात कोल्हापूर महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवकही सहभागी होतील, असे महापौर शोभा बोंद्रे यांनी यावेळी सांगितले. सर्किट बेंचप्रश्नी भाजप-शिवसेना सरकार जनतेची ...

ठळक मुद्देमहापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक सहभागी होणार : शोभा बोंद्रेखंडपीठ नागरी कृती समितीचा निर्धार

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी सर्व वकील, पक्षकारांना येथील जिल्हा न्यायालयात जाण्यापासून रोखण्याचा निर्धार खंडपीठ नागरी कृती समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री करण्यात आला. समितीचे निमंत्रक आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते.

या आंदोलनात कोल्हापूर महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवकही सहभागी होतील, असे महापौर शोभा बोंद्रे यांनी यावेळी सांगितले. सर्किट बेंचप्रश्नी भाजप-शिवसेना सरकार जनतेची फसवणूक करत असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. न्यायसंकुलमध्ये ही बैठक झाली.कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, शाहू महाराज यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यावेळी सर्किट बेंचच्या मूलभूत सुविधांसाठी ११०० कोटींची तरतूद करतो, सर्किट बेंचबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती यांना पत्र देतो, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते; पण त्यातील एकही मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही.शोभा बोंद्रे म्हणाल्या, राज्यशासन याप्रश्नी दुजाभाव, वेळकाढूपणाचे धोरण अवलबंत आहे. सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे. आर. के.पोवार म्हणाले, डिसेंबरपूर्वी उग्र आंदोलन करूया. पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊया.माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, एकही वकील न्यायालयात जाणार नाही. ते तुमच्याबरोबर आंदोलनात सहभागी होतील. चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारच्या हिताला बाधा आणली पाहिजे. प्रा. एन. डी. पाटील यांच्या समवेत बैठक होऊनही हे सरकार खोटे बोलत आहे.आनंद माने म्हणाले, हे सरकार फसवे आहे. पुण्याच्या पगडीमुळे कोल्हापूर सर्किट बेंच होण्यास अडचणी येत आहेत. कोल्हापूर जिल्हा चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, या आंदोलनात व्यापार, उद्योजक अग्रभागी सहभागी होतील. क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, तुम्ही आंदोलन करा, आमचा पाठिंबा राहील.यावेळी दीपा पाटील, दिलीप देसाई, पद्माकर कापसे, बाबा पार्टे, उदय लाड, सुभाष जाधव, पंडित कंदले, भगवान काटे, जयेश कदम, प्रसाद जाधव, सुनील सामंत, अशोक पोवार, किशोर घाटगे, बी. एल. बरगे, बाबूराव कदम, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. अजित मोहित, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सचिन तोडकर, सुहास साळोखे, चंद्रकांत बराले, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर