शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

कोल्हापूर :सीपीआरमध्ये दुर्बिणीद्वारे वृद्वेवर छिद्राची हृदयशस्त्रक्रिया : जयप्रकाश रामानंद, करडवाडीतील लक्ष्मी खतकर ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 17:05 IST

शरीराची कोणतीही चिरफाड न करता पायाच्या नसेतून अतिसुक्ष्म दुर्बिणीच्याद्वारे कोल्हापूर जिल्हयातील करडवाडी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी कृष्णा खतकर (वय ७० ) वृद्धेवर हृदयामधील छिद्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्रथमच अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये दुर्बिणीद्वारे वृद्वेवर छिद्राची हृदयशस्त्रक्रिया : जयप्रकाश रामानंदकरडवाडीतील लक्ष्मी खतकर ठणठणीत‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआर’

कोल्हापूर : शरीराची कोणतीही चिरफाड न करता पायाच्या नसेतून अतिसुक्ष्म दुर्बिणीच्याद्वारे कोल्हापूर जिल्हयातील करडवाडी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी कृष्णा खतकर (वय ७० ) वृद्धेवर हृदयामधील छिद्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्रथमच अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. रामानंद म्हणाले, जन्मजात एखाद्या व्यक्तिला हृदयाला छिद्र असणे वेगळे.पण,उतरत्या वयात लक्ष्मी खतकर यांना हृदयविकाराचा (हार्ट अ‍ॅटॅक) झटका आला व त्यांच्या हृदयाला आश्चर्यकारकरित्या छिद्र (पीआय-व्हीएसआर-डीसी) पडले.

त्यांच्यावर प्रथम खासगी रुग्णालयानानंतर डिसेंबर २०१७ मध्ये त्यांना सीपीआरमध्ये आणण्यात आले. हृदयविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. बुधवारी (दि. १०) सुमारे सव्वातास लक्ष्मी खतकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.याबाबत डॉ. अक्षय बाफना म्हणाले, हृदयास अशाप्रकारे छिद्र पडणे ही एक दुर्मिळ घटना आहे. या रुग्णाचा जीव वाचविणे हे एक आव्हानच होते. अतिसुक्ष्म दुर्बिण पायाच्या नसेतून हृदयापर्यंंत सावधगिरीने ही शस्त्रक्रिया करुन ते छिद्र बंद केले. १८ मिलिमीटरचे हे छिद्र होते.

खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे पाच ते दहा लाखांपर्यंत खर्च आहे. पण, याठिकाणी एक लाख २० हजार रुपयांत ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून केली. युरोपियन सोसायटी आॅफ कार्डिओलॉजीमध्ये याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या वृद्धेचे प्रकृति चांगली आहे.यासाठी वैद्यकिय अधीक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे, हृदयरोग विभागप्रमुख डॉ. रणजित जाधव, डॉ. माजिद मुल्ला, डॉ. रणजित पवार, भूलतज्ज्ञ डॉ. हेमलता देसाई, संजीवक अरुण पाटील, देवेंद्र शिंदे आदींनी परिश्रम घेतले. पत्रकार परिषदेस अभ्यागत समितीचे अशासकीय सदस्य सुनील करंबे उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल