शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे विक्रम तोडले : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 10:19 IST

गेली पाच वर्षे पारदर्शी पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे सर्व विक्रम तोडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे विक्रम तोडले : फडणवीसकोल्हापुरात जल्लोषी वातावरणात स्वागत

कोल्हापूर : गेली पाच वर्षे पारदर्शी पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे सर्व विक्रम तोडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ताराराणी चौकामध्ये भाजपच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, राज्य उपाध्यक्ष धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, बाबा देसाई त्यांच्यासमवेत होते. यावेळी शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांनाही फडणवीस यांनी भाषणात अभिवादन केले.फडणवीस म्हणाले, कोल्हापुरातील या भव्य स्वागताबद्दल आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली ५ वर्षे आम्ही काम केले आहे. हे पहिले सरकार आहे, हा पहिला मुख्यमंत्री आहे जो पाच वर्षे काम केल्यानंतर जनतेच्या दारात जाऊन केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहे.यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, सुनील कदम, अशोक देसाई, नगरसेवक, नगरसेविका, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.धनंजय, अमल, महेश, समरजित यांच्यावर विश्वास आहे का?फडणवीस यांनी आपल्या सातच मिनिटांच्या भाषणामध्ये तुमचा नरेंद्र मोदींवर, माझ्यावर, चंद्रकांतदादांवर विश्वास आहे का, अशी सुरूवातीलाच विचारणा केली तेव्हा ‘होय, होय’ असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘अमलवर विश्वास आहे का, महेशवर विश्वास आहे का, धनंजयवर विश्वास आहे का’ अशी विचारणा केली तेव्हाही तसाच प्रतिसाद मिळाला.

याचवेळी समरजित घाटगे त्यांच्या पाठीमागे येऊन उभे होते. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते. तेव्हा कार्यकर्त्यांनी समरजित यांचे नाव घेण्याचा आग्रह केला तेव्हा ते आलेत मला माहिती नव्हते, असे सांगत, ‘तुमचा समरजित घाटगे यांच्यावर विश्वास आहे का,’ अशी विचारणा केली आणि कार्यकर्त्यांनी ‘होय, होय’चा प्रतिसाद दिला.ताराराणी चौक उजळलामुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठे दिवे लावण्यात आले होते. लेसरवर भाजपचे कमळ चिन्ह दाखविण्यात येत होते. विविध स्क्रीनवर भाजप सरकारच्या कामगिरीची चित्रफीत दाखविण्यात येत होती. ताशांचा कडकडाट आणि आतषबाजीमध्ये फडणवीसांच्या विजयाच्या घोषणा देत स्वागत करण्यात आले. भाजपच्या सर्व नगरसेविका आणि पदाधिकारी भगव्या साड्या परिधान करून उपस्थित होत्या.

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राkolhapurकोल्हापूर