शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी ‘ महाराष्ट्र ’ चे दोन्ही संघ पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:55 IST

उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने मुंबई विभागाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देकाडसिद्धेश्वर हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींचा संघ असे तीन संघ एकाचवेळी पात्र ठरले दोन्ही संघांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी राज्याचे संघ म्हणून निवड

कोल्हापूर : उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने मुंबई विभागाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या कामगिरीवर या दोन्ही संघांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेसाठी राज्याचे संघ म्हणून निवड झाली.

चौदा वर्षाखालील गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाने मुंबई विभागाचा ४-२ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्रकडून विजयी संघात संकेत मेढे, प्रशांत सलवादे, ओंकार ताते, आयुष केसरकर, निळकंठ चव्हाण, शुभम बेडेकर, ऋतुराज नलवडे, दर्शन पाटील, प्रेम देसाई, अमन सय्यद, अथर्व मोरे, पार्थ सुतार, श्रवण शिंदे, शाहीद महालकरी, पार्थ मोहीते, ऋषिकेश पाटील यांचा समावेश होता.

सतरा वर्षाखालील गटात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाने मुंबई संघाचा अंतिम सामन्यांत २-१ असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. यात महाराष्ट्रकडून विशाल पाटील, सिद्धीक नायकवडी यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.या विजयी संघात जय कामत, संदेश कासार, विश्व शिंदे, रोहीत देसाई, विशाल पाटील, विराज साळोखे, शुंभकर गोसावी, चंदन गवळी, ओंकार ेचौगुले, अनिरुद्ध जाधव, अभिषेक भोपळे, निरंजन कामते, सुशांत पाटील, सिद्धीक नायकवडी, शुभम कापुसकर, खुर्शिद अली यांचा समावेश आहे. या संघास प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हायस्कूलचे १४ व १७ वर्षाखालील मुले असे दोन व गुरुवारी (दि. २७) ला काडसिद्धेश्वर हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींचा संघ असे तीन संघ एकाचवेळी पात्र ठरले आहेत. उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांमध्ये अजिंक्यपद पटकाविलेला महाराष्ट्र हायस्कूलच्या विजयी संघासोबत प्रशिक्षक प्रदीप साळोखे. 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर