शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेवर ‘कोल्हापूर’ची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:06 IST

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांमध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाचा, तर एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये मुंबई विभागाचा पराभव करीत कोल्हापूर

ठळक मुद्देसतरा वर्षांखालील मुलांमध्ये क्रीडा प्रबोधिनीचाएकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये मुंबई विभागाच्या संघाने विजेतेपद पटकाविले.

कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांमध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाचा, तर एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये मुंबई विभागाचा पराभव करीत कोल्हापूर विभाग संघाने बुधवारी विजेतेपदावर मोहोर उठविली.

विभागीय क्रीडा संकुल येथे बुधवारी १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल)ने क्रीडा प्रबोधिनी (पुणे)चा ३-० असा धुव्वा उडवित विजेतेपदावर मोहर उठविली. कोल्हापूरकडून अभिषेक भोपळे, विश्व शिंदे, खुर्शीद अली यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली. तत्पूर्वी कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा टायब्रेकरवर ५-३ असा पराभव करीत, तर क्रीडा प्रबोधिनी संघाने नाशिक विभागाचा ४-० असा पराभव करीत, अंतिम फेरी गाठली होती.

विजयी संघात (कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र हायस्कूल) - श्रीतेज मिरजकर, ओंकार चौगुले, विराज साळोखे, खुर्शीद अली, विशाल पाटील, जय कामत, अभिषेक भोपळे, रोहित देसाई, निरंजन कामते, संदेश कासार, विश्व शिंदे, सिद्धीक नायकवडी, संकेत बुचडे, मयुरेश भोसले, पृथ्वीराज पवार, प्रथमेश पवार, संकेत गिड्डे, सोमेश मेटिल , प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार, शरद मेढे यांचा समावेश होता.

शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये अंतिम सामन्यात कोल्हापूर विभाग (काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी)ने मुंबई विभाग (फादर अ‍ॅग्लो स्कूल)चा ४-० असा धुव्वा उडवित विजेतेपदावर नाव कोरले. कोल्हापूरकडून तेजस्विनी कोळसे हिने तीन, तर सानिका चौगुले हिने एक गोलची नोंद केली. तत्पूर्वी उपांत्य सामन्यांत कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा ४-० असा पराभव करीत, तर मुंबई विभागाने अमरावती विभागाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.

विजयी संघात अर्पिता पवार, सोनाली साळवी, सोनाली सुतार, निशा पाटील, जुलेखा बिजली, शाहीन मुल्लाणी, पौर्णिमा साळे, श्रृतिका चौगले, सरस्वती माळी, सानिका चौगले, ऋतुजा पाटील, तेजस्विनी कोळसे, पूनम शिंदे, सानिका पाटील, नम्रता यादव, कोमल डाफळे, सिमरन नावळेकर, स्नेहल कांबळे, प्रशिक्षक अमित शिंत्रे, शैलेश देवणे यांचा समावेश होता.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, के. एस. ए. सचिव माणिक मंडलिक, विनय पाटील, आर. डी. पाटील, एस. ए. रामाणे, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, सचिन पांडव, प्रा. अमर सासने, सुमित पाटील, राजेंद्र बुवा, आदी मान्यवर उपस्थित होते. २१११२०१८ - कोल-फुटबॉल वूमेन्स कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींमध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या कोल्हापूर विभाग (काडसिद्धेश्वर हायस्कूल) संघास बुधवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.--------पाच विजेतेपदयंदाच्या राज्यस्तरीय शालेय खेळ हंगामात महाराष्ट्र हायस्कूलने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना मुलांमध्ये १४, १७ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक व राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत विजेतेपद, तर १९ वर्षांखालील गटात उपविजेतेपद पटकाविले. अशी कामगिरी करणारा राज्यातील कोल्हापूर विभागाचा हा संघ एकमेव ठरला आहे.--------फोटो : २१११२०१८-कोल-फुटबॉल बॉईजओळी : कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद पटकाविणाºया कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघास बुधवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.----सर्व छाया : नसीर अत्तार

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर