शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कर्णाला न्याय देण्यासाठी ‘मृत्युंजय’ची निर्मिती, सागर देशपांडे यांनी सांगितली जन्मकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:27 IST

शाळकरी वयापासून कर्णाबद्दल आस्था असणाऱ्या शिवाजी सावंत यांनी ‘महाभारता’मध्ये उपेक्षित असलेल्या कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मृत्युंजय’ची निर्मिती केली, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिरच्या वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत सोमवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देकरवीर नगर वाचन मंदिरची वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमाला‘मृत्युंजय’चा सुवर्णमहोत्सव’ विषयावर डॉ. देशपांडे यांनी केली मांडणी वयाच्या २३ व्या वर्षी कादंबरी लिहायला घेतली, २७ व्या वर्षी प्रकाशित

कोल्हापूर : शाळकरी वयापासून कर्णाबद्दल आस्था असणाऱ्या शिवाजी सावंत यांनी ‘महाभारता’मध्ये उपेक्षित असलेल्या कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मृत्युंजय’ची निर्मिती केली, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिरच्या वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत सोमवारी ते बोलत होते.

‘मृत्युंजय’चा सुवर्णमहोत्सव’ या विषयावर मांडणी करताना डॉ. देशपांडे यांनी या कादंबरीची जन्मकथा सांगून त्यामध्ये असलेल्या कोल्हापूरकरांच्या अपूर्व अशा योगदानाचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. वाचन मंदिराचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे अध्यक्षस्थानी होते.डॉ. देशपांडे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेल्या शिवाजी सावंत यांनी येथील पापाच्या तिकटीवर हावळ टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यानंतर न्यायालयात नोकरी केली, परंतु कर्णावरील अभ्यासासाठी त्यांनी ती नोकरी सोडून राजाराम हायस्कूलमध्ये शॉर्टहॅण्डचे शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. जवळच असणाऱ्या करवीर नगर वाचन मंदिरामध्ये तासन्तास बसून त्यांनी ‘महाभारता’वरील अनेक ग्रंथ वाचून काढले.केदारनाथ मिश्र यांच्या कर्णावरील खंडकाव्याने प्रभावित होऊन सावंत यांनी एकीकडे सर्व प्रकारची टिपणे काढतानाच थेट कुरूक्षेत्राला भेट दिली आणि वयाच्या २३ व्या वर्षी ही कादंबरी लिहायला घेतली. २७ व्या वर्षी ती प्रकाशित झाली आणि आजही ५० वर्षे झाली तरी ही कादंबरी अजूनही सर्व वयोगटातील वाचकांना भावते हे या कादंबरीचे यश आहे, असे डॉ. देशपांडे म्हणाले.‘कनवा’चे संचालक डॉ. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर कोषाध्यक्ष डॉ. आशुतोेष देशपांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संचालक गुरूदत्त म्हाडगुत यांनी आभार मानले. गंथपाल मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महालक्ष्मी बँकेच्या उपाध्यक्षा मेघा जोशी, सुरेश सोनटक्के, रवींद्र जोशी, रजनी हिरळीकर, अशोक भोईटे, राजीव परुळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ग. दि. माडगूळकरांसह कुलकर्णींचे योगदानइतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘मृत्युंजय’ छापण्यासाठी कुणीही तयार नसताना सावंत यांचे मित्र आर. के. कुलकर्णी यांनी ते बाड ग. दि. माडगूळकर यांना वाचावयास दिले. माडगूळकर यांनी ते कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णींकडे सोपविले. ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यामुळे या कादंबरीच्या निर्मितीमध्ये या दोन कुलकर्णींचे मोठे योगदान आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य