शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जैववैद्यकीय कचरा प्रकल्प महापालिका चालवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:43 IST

कोल्हापूर शहरातील डॉक्टरांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी तसेच भाडे व रॉयल्टीची थकबाकी या दोन प्रमुख कारणांस्तव महानगरपालिका प्रशासनाने जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पाचा ठेका ‘नेचर अ‍ॅँड नीड’ या संस्थेकडून गुरुवारी काढून घेतला. आता हा प्रकल्प महापालिका आरोग्य खाते स्वत:च चालविणार असून, त्यासाठीची आवश्यक ती यंत्रणा तातडीने उभी केली.

ठळक मुद्देजैववैद्यकीय कचरा प्रकल्प महापालिका चालवणारतक्रारी, थकबाकीच्या कारणास्तव ‘नेचर अ‍ॅँड नीड’चा ठेका रद्द

 

कोल्हापूर : शहरातील डॉक्टरांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारी तसेच भाडे व रॉयल्टीची थकबाकी या दोन प्रमुख कारणांस्तव महानगरपालिका प्रशासनाने जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पाचा ठेका ‘नेचर अ‍ॅँड नीड’ या संस्थेकडून गुरुवारी काढून घेतला. आता हा प्रकल्प महापालिका आरोग्य खाते स्वत:च चालविणार असून, त्यासाठीची आवश्यक ती यंत्रणा तातडीने उभी केली.शहरात निर्माण होणारा जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने २०१२ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यावेळी ‘नेचर अ‍ॅँड नीड’ या संस्थेची निविदा मंजूर करून त्यांना पुढील दहा वर्षांकरिता ठेका देण्यात आला होता.

शहरातील सर्व दवाखान्यांतून जैववैद्यकीय कचरा गोळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती; परंतु या संस्थेबद्दल शहरातील डॉक्टर्स मंडळींकडून तक्रारी व्हायला लागल्या. त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तक्रारींत तथ्य आढळले होते. शिवाय या प्रकल्पात आवश्यक ती उपकरणेही नसल्याची बाब समोर आली होती. त्यावेळी महापालिकेच्या प्रशासनाने त्यांना नोटीस देऊन ठेका काढून घेण्याचा इशारा दिला होता.महापालिकेच्या नोटिसीविरुद्ध ‘नेचर’ डायरेक्टर्सनी २०१३ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली. त्यावेळी लवादाने पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय ठेका रद्द करू नये, असा निकाल दिला होता. त्यानंतर ‘नेचर’च्या कामात सुधारणा झाली नाही. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारी सुरूच होत्या. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने त्यांना पुन्हा नोटीस दिली.

भाड्याची ६० हजार व रॉयल्टीची ५३ लाख ६७ हजार ६०० रुपयांची थकबाकी तातडीने भरावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्यासाठी एक महिन्याची मुदत त्यांना दिली होती; पण मुदतीत त्यांनी ही थकबाकी भरली नाही; म्हणून कायद्यातील ८१ ब प्रमाणे प्रक्रिया राबवून गुरुवारी कंपनीचा ठेका रद्द करून प्रकल्प ताब्यात घेतला.दरम्यान, येथील प्रजासत्ताक संस्थेने ठेका काढून घेत असताना महापालिकेच्या प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी तशी व्यवस्था झाली होती.

महापालिकेची यंत्रणा कार्यान्वितजैव व वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी महानगरपालिकेने आवश्यक यंत्रणा उभी केली असून, महापालिका स्वत: सक्षमपणे जैव व वैद्यकीय कचरा प्रकल्प चालविणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण संवर्धन अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक व १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जैववैद्यकीय कचरा संकलन करण्यासाठी स्वतंत्र चार वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणचा ईटीपी, चिमणी, इत्यादी बाबींकरिता स्वतंत्र तांत्रिक सल्लागार नेमलेला आहे. महापालिका आज, शुक्रवारपासून स्वत: कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे.

यापूर्वीही झाली होती कारवाईमहापालिकेच्या आरक्षित असलेल्या जागेपैकी १० हजार चौ. फू. खुली जागा नेचर इन नीड, सातारा या संस्थेस दर चौ. फुटास एक रुपया या वार्षिक भाड्याने १० वर्षे मुदतीने व मासिक रॉयल्टी १ लाख ०८ हजार रुपये भरण्याच्या अटीवर दि. ११ सप्टेंबर २०१२ रोजी देण्यात आली होती. तथापि सदर संस्थेच्या कामकाजातील गंभीर त्रुटींमुळे आरोग्यविघातक परिस्थिती निर्माण होऊ शकत असल्याच्या कारणास्तव तसेच संस्थेकडून होत असलेला निष्काळजीपणा व कामातील गंभीर त्रुटींमुळे २१ सप्टेंबर २०१३ रोजी सदर संस्थेस दिलेला ठेका रद्द करण्यात आला होता; पण त्यांच्याकडून कामात सुधारणा झाली नाही.

कोल्हापूर शहरातील जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा नेचर अ‍ॅन्ड नीड या संस्थेचा ठेका महानगरपालिका प्रशासनाने रद्द केला. या प्रकल्पाला गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. यावेळी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयkolhapurकोल्हापूर