शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : डेंग्यूबाबत दक्ष रहा : बोंद्रे, पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण, घरांचे सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 11:55 IST

कोल्हापूर शहरात गेल्या पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून त्याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण शहरभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वच घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी डेंग्यूच्या साथीबाबत बोलविलेल्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या बैठकीत डेंग्यूबाबत दक्ष रहाण्याच्या बोंद्रे यांनी दिल्या सूचनापाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण, घरांचे सर्व्हेक्षण सुरू

कोल्हापूर : शहरात गेल्या पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून त्याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण शहरभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वच घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी डेंग्यूच्या साथीबाबत बोलविलेल्या बैठकीत दिली.डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. म्हणूनच डेंग्यूबाबत महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. आरोग्य निरीक्षकांनी प्रत्येक प्रभागात स्वच्छता ठेवून परिसर डेंग्यूमुक्त ठेवावा, अशा सूचना महापौर बोंद्रे यांनी यावेळी दिल्या.आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी नूतन महापौर बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर साथ रोग अधिकारी डॉ. रमेश जाधव यांनी प्रेझेंटेशनद्वारे डेंग्यूबाबतच्या उपाय योजनेची माहिती दिली.डेंग्यू प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत शहरातील सर्वच कुटुंबांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. शौचालयांचे व्हेंट पाईपला जाळी किंवा कापड बांधणे, शहरातील उघड्यावर असलेल्या टायर जप्त करणे, साठवूण ठेवलेल्या पाण्यामध्ये डास, अळी आहेत का? याबाबत सर्व्हेक्षण करणे, धूर व औषध फवारणी करणे. ताप आलेल्या रुग्णांचेही सर्व्हेक्षण करण्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आरोग्यविभागाकडे किटकनाशके व जंतुनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला असल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले. शहरातील झोपडपट्टी व गरीब, गरजू रुग्णांना अल्पदरात औषधोपचार करण्यात यावा. प्रत्येक प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशा सूचना उपमहापौर महेश सावंत यांनी मांडल्या.

सभागृहनेता दिलीप पवार यांनी शहरामध्ये नालेसफाई सुरू आहे का? भागातील गटर स्वच्छ करता का? धूर व औषध फवारणी महिन्यातून किती वेळा करता? याबाबत विचारणा केली. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी त्याचा खुलासा केला.यावेळी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे, अति.आयुक्त श्रीधर पाटणकर, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.महापौरांचे नागरिकांना आवाहन

  1. - घरामध्ये व आजूबाजूस सांडपाणी व कचरा साचून राहणार नाही याची खबरदारी घ्या.
  2. - घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर झाकून ठेवावेत.
  3. - साठवून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एकवेळा कोरडी करून स्वच्छ ठेवावीत.
  4. - घरामध्ये औषध फवारणीसाठी आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
  5. - नारळाच्या करवंट्या, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी.
  6. - फ्रिजच्या मागील जाळ्या स्वच्छ ठेवाव्यात. झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये.

 

कोणती उपाययोजना करण्यात येत आहे ?

  1. - शहरात २३८२० व्हेंट पाईपला जाळी बसविली.
  2. - आतापर्यंत १४०१ टायर्स जप्त करण्यात आल्या.
  3. - डेंग्यू प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरात ३०० पथके कार्यरत.
  4. - आज अखेर सर्वेक्षण केलेल्या घरांची संख्या ७७,६०८.
  5. - डास व आळी सापडलेल्या घरांची संख्या १६३०.
  6. - शहरामध्ये ७७,६०८ घरांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती पत्रकांचे वाटप.

 

नाले सफाईचे काम सुरू

  1. - शहरातील ४७६ नाल्यांपैकी ४२० नाल्यांची सफाई
  2. - जेसीबीच्या साहाय्याने ३३६ नाल्यांपैकी १७७ नाल्यांची सफाई.
  3. - गोमती व जयंती नाल्यांची पोकलँन्डद्वारे १३ कि.मी पैकी ७.५ कि.मी. अंतराची सफाई पूर्ण.
  4. - उर्वरित सर्व नाल्यांची ५ जून पर्यंत सफाई पूर्ण करण्यात येणार.
  5. - प्रत्येक प्रभागात आठवड्यातून २ वेळा धूर फवारणी व १५ दिवसांतून एकदा औषध फवारणी करणार.

 

टॅग्स :dengueडेंग्यूkolhapurकोल्हापूर