शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

कोल्हापूर बाजार समिती निवडणूक: महाविकास आघाडीसमोर कोरे, महाडिक, मंडलिकांचे आव्हान

By राजाराम लोंढे | Updated: March 23, 2023 14:25 IST

राज्यातील सत्तांतरानंतर व लोकसभेपूर्वी बाजार समितीच्या निमित्ताने आघाडी व भाजप-शिवसेना नेत्यांचा कस लागणार

कोल्हापूर : बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला रोखण्यासाठी गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेले आमदार विनय काेरेंना आपल्याकडे घेऊन आव्हान निर्माण करण्याची खेळी भाजप-शिवसेनेची आहे. गेल्यावेेळेला विरोधात असलेले आमदार पी. एन. पाटील यांना आपल्यासोबत घेऊन आघाडी भक्कम करण्याची रणनीती आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची राहणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर व लोकसभेपूर्वी बाजार समितीच्या निमित्ताने आघाडी व भाजप-शिवसेना नेत्यांचा कस लागणार हे निश्चित आहे.करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा व निम्मा कागल असे साडे सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र कोल्हापूर बाजार समितीचे आहे. समितीवर २००२ पूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता होती. मात्र २००२ नंतर राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाने सत्ता ताब्यात घेतली, मात्र संचालकांच्या बंडखोरीने पुन्हा महाडिक यांच्या ताब्यातच सत्ता गेली. २००७ पासून २०२० पर्यंत राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाची एकहाती सत्ता राहिली आहे.समितीच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी, जनसुराज्य, आमदार सतेज पाटील गट, शेकाप, समरजित घाटगे गट यांच्या आघाडीला १९ पैकी १५ जागा मिळाल्या होत्या. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाला दोन, भाजपला एक तर एक अपक्षाने बाजी मारली होती. आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने झुंज दिली होती.

गेल्या पाच-सहा वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात फेरबदल झाले असून, राज्यातील सत्तांतराचे पडसाद या निवडणुकीत उमटणार आहेत. जिल्हा बँक, ‘गोकुळ’ व बाजार समिती ही तीन दोन्ही काँग्रेसची सत्ता केंद्रे आहेत, येथील सत्ताच लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या अडचणीच्या ठरू शकतात. यासाठी बाजार समितीत दोन्ही काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप-शिवसेना निकराचे प्रयत्न करणार हे निश्चित आहे.

‘ए.वाय.’ यांच्या भूमिकेकडे लक्षराधानगरी तालुक्यातील विकास संस्था व ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची पकड आहे. मात्र ते गेली दोन वर्षे पक्षात अस्वस्थ आहेत. खासदार मंडलिक यांच्याशी वाढलेली सलगी भविष्यातील राजकारणावर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘ए.वाय.’ यांना सोबत घेण्याचा भाजप, शिवसेनेेचा प्रयत्न आहे. तसे झाले तर महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढणार हे निश्चित आहे.तरच लोकसभेला योग्य संदेश जाईललोकसभेची निवडणूक वर्षभरावर आल्याने त्याची बांधणी आताच करावी लागणार आहे. बाजार समिती निवडणुकीला एकसंधपणे सामोरे गेलो तरच लोकसभेसाठी योग्य संदेश जाऊ शकतो, तसा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.मागील सभागृहात असे होते बलाबल :राष्ट्रवादी - ६जनसुराज्य - ५सतेज पाटील - २चंद्रदीप नरके - २भाजप -१समरजित घाटगे - १शेकाप - १अपक्ष - १असे राहणार गट -गट               जागाविकास संस्था ११ (सर्वसाधारण : ७, इतर मागासवर्गीय -१, भटक्या विमुक्त जाती-१, महिला -२)ग्रामपंचायत    ०४ (सर्वसाधारण :२, आर्थिक दुर्बल : १, अनुसूचित जाती -१)अडते, व्यापारी ०२हमाल तोलाईदार ०१

संभाव्य पॅनल असे -महाविकास आघाडी : हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सत्यजित पाटील-सरुडकर, मानसिंगराव गायकवाड, संजय घाटगे, संपतराव पवार.भाजप-शिवसेना आघाडी : चंद्रकांत पाटील, विनय काेरे, संजय मंडलिक, धनंजय महाडिक, प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, बजरंग देसाई, पी. जी. शिंदे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजारElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण