शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची केळी परदेशात

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

कुंभोजच्या शेतकऱ्यांचे उत्पादन : ‘संजीवनी अ‍ॅग्रो’च्या मदतीने रवाना, पहिल्यांदाच संधी

भोमगोंडा देसाई : कोल्हापूर :जिल्ह्यातील कुंभोज (ता. हातकणगंले) येथील अरविंद पाटील, अनिल नकाते यांच्या शेतातील २१ टन केळी संयुक्त दुबईला पाठविण्यात आली. त्या बाजारपेठेतून मागणी आल्यानंतर तमदलगे (ता. शिरोळ) येथील संजीवनी अ‍ॅग्रो संस्थेतर्फे ही केळी पाठविण्यात आली. कोल्हापुरी चप्पल आणि गुळानंतर आता येथील केळीही सातासमुद्रापार जात आहेत. जिल्ह्यात मुख्य व्यापारी पीक म्हणून उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि बाजारपेठेची हमी यांमुळे शेतकरी उसाला पहिली पसंती देतो. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळत नसल्यामुळे अलीकडे शेतकरी केळी पीक घेण्याकडे वळतो आहे. शासनाचा कृषी विभागही केळी पिकाच्या लागवडीपासून ते त्याला बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मदत करीत आहे. पिकविण्यापासून विकण्यापर्यंत वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक, खासगी भागीदारी योजनेंतर्गत संजीवनी अ‍ॅग्रो संस्थेची निवड फेब्रुवारी २०१४ मध्ये केली आहे. या संस्थेकडे केळी उत्पादन घेणारे साडेसातशे शेतकरी संबंधित आहेत. तालुकानिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करून बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. या संस्थेतर्फे कर्नाटक, हरियाणा, जम्मू, दिल्ली, राजस्थान या राज्यांतील बाजारपेठांत केळी पाठविली आहेत. आता दुबईच्या बाजारपेठेकडेही ती रवाना झाली . श्री. पाटील, नकाते हे शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून केळींचे उत्पादन घेतात. या दोन्ही शेतकऱ्यांची सध्या आठ एकर क्षेत्रावर केळी आहेत. ‘जी नाईन’ जातीची केळी त्यांनी लावली आहेत. या दोन शेतकऱ्यांची केळी दुबई येथील व्यापाऱ्यास पहिल्यांदा इंटरनेटच्या माध्यमातून दाखविली. त्यांनी पसंती दिली. त्यामुळे गुरुवारी २१ टन केळीचा कंटेनर रवाना झाला. तो मुंबईतून समुद्रमार्गे दुबईपर्यंत पोहोचणार आहे.‘संजीवनी’सारख्या संस्थेच्या मदतीने बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. कोल्हापूरची केळी पहिल्यांदाच दुबईला गेली. यामध्ये कृषी विभागाचा मोठा वाटा आहे.- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षककेळी दुबईला पाठविल्याने चार पैसे अधिक मिळणार आहेत. कृषी विभाग व संजीवनी संस्था यांच्यामुळे दुबई बाजारात आमच्या शेतातील केळी जात आहेत, याचा अभिमान आहे.- अनिल नकाते, शेतकरीसंजीवनी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. शासनाच्या योजना पोहोचविल्या जात आहेत. मागणी आल्यानंतर दुबईला केळी पाठविली आहेत. उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, कानपूर येथूनही केळ्यांना मागणी आली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ती पाठविता आलेली नाहीत. - चेतन पाटील, चेअरमन, संजीवनी अ‍ॅग्रो