शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर : बाबूभाई परीख पूल वाहतुकीसाठी पूर्ववत, ४० वर्षे जुनी ड्रेनेज लाईन बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:31 IST

बाबूभाई परीख पुलाच्या खालील ४० वर्षी जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यासाठी या मार्गावरील वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

ठळक मुद्देबाबूभाई परीख पूल वाहतुकीसाठी पूर्ववत४० वर्षे जुनी ड्रेनेज लाईन बदलली

कोल्हापूर : बाबूभाई परीख पुलाच्या खालील ४० वर्षी जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यासाठी या मार्गावरील वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.गेल्या आठ दिवसांपासून शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, साईक्स एक्स्टेंशनकडून मध्यवर्ती बसस्थानक, न्यू शाहूपुरी, ताराबाई पार्क, स्टेशन रोडला जोडणारा रेल्वेचा बाबूभाई परीख पूल महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर नागरिकांना एकतर उड्डाणपूल किंवा शाहूपुरी गोकुळ हॉटेल परिसरातून फिरून जावे लागते.

हा पल्ला किमान एक किलोमीटर एवढा आहे. त्यामुळे जवळचा मार्ग म्हणून या बाबूभाई परीख पुलाखालून जाणे नागरिकांना सोयीचे होते. या पुलाखालून चाळीस वर्षांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती कालमर्यादेमुळे खराब झाली होती.

गेल्या काही वर्षांपासून पावसाळा असो वा उन्हाळा बाराही महिने या परिसरात मैलामिश्रित पाणी साचून दुर्गंधी ही पाचविलाच पूजलेली होती. एक तर काम करायचे म्हटले तर नागरिकांची गैरसोय होणार म्हणून महापालिका आरोग्य विभाग केवळ तात्पुरती मलमपट्टी करत होता. त्यातून या परिसरात पुन्हा-पुन्हा मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत होते.

ही बाब नगरसेवक संजय मोहिते यांनी गांभीर्याने घेऊन आठ दिवसांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईनच बदलण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार १.७५ हजार रुपयांचे तातडीचे काम आयुक्तांकडून मंजूर करून घेतले. त्यानुसार कामासही सुरुवात केली. दोन चेंबरचे काम पूर्ण करत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. त्यात १५ दिवसांचे काम ८ दिवसांत पूर्ण केले. शुक्रवारी हे काम पूर्ण झाले आणि वाहतुकीसाठी हा पूल पूर्ववत सुरू झाला.

बाबूभाई परिख पुलाजवळील चौकात मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक त्रासले होते. ही बाब ओळखून चाळीस वर्षांपूर्वीची ड्रेनेज पाईपलाईन बदलून टाकण्यात आली. त्यामुळे हा परिसर मैलामुक्त करून शहरवासीयांना दिलासा दिला.- संजय मोहिते,नगरसेवक

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर