शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बुडणाऱ्यास वाचविल्याबद्दल आळवेकर, सूर्यवंशी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:00 IST

घरगुती गणपती विसर्जनावेळी विहिरीतील पाण्यात बुडताना युवकास वाचविल्याप्रकरणी अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी यांचा मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्दे बुडणाऱ्यास वाचविल्याबद्दल आळवेकर, सूर्यवंशी यांचा सत्कारधाडसाचे कौतुक : तुकाराम माळी तालीम मंडळातर्फे आयोजन

कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जनावेळी विहिरीतील पाण्यात बुडताना युवकास वाचविल्याप्रकरणी अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी यांचा मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शहरातील बेलबागमधील गांजीवाली विहिरीमध्ये घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी तयार केलेली काहील घेऊन दीपक साळोखेंसह एकूण चौघेजण पाण्यात मध्यावर गेले. यावेळी अचानक काहील पाण्यात मध्यावर गेल्यानंतर उलटली.

यामध्ये असणारे चौघेजण पाण्यात पडले. त्यांतील तिघेजण पोहत बाहेर आले; तर तालमीचे कार्यकर्ते दीपक साळोखे हे पाण्यात बुडत असताना अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी यांनी क्षणाचाही विचार न करता धाडसाने पाण्यात उड्या मारून बुडणाऱ्या दीपक साळोखे या युवकाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविला.याबद्दल श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वतीने अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी या दोघांचा सत्कार डॉ. सोनलकुमार कदम यांच्या हस्ते करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. यावेळी अनिल घाटगे, प्रा. अरुण पाटील, बुलबुले यांच्यासह तालीम मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार व उत्सव कमिटी उपाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, माजी नगरसेवक आनंदराव पायमल, प्रकाश टिपुगडे तसेच गणराया अवॉर्डचे परीक्षक, नागरिक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर