शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लेखक ल. रा. नसिराबादकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 14:44 IST

संत साहित्याचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. ल. रा. तथा लक्ष्मण रामदास नसिराबादकर यांचे मंगळवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८४ होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, मुलगा सुनिल, मुलगी सुनिता, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

ठळक मुद्देलेखक ल. रा. नसिराबादकर यांचे निधन संत तुकाराम अध्यासनाचे संस्थापक संचालक

कोल्हापूर : संत साहित्याचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. ल. रा. तथा लक्ष्मण रामदास नसिराबादकर यांचे मंगळवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८४ होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, मुलगा सुनिल, मुलगी सुनिता, सूना, नातवंडे असा परिवार आहे.लेखक नसिराबादकर यांना मंगळवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. त्यावर त्यांच्या कुटंबियांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नसिराबाद (जि. जळगांव) हे लेखक नसिराबादकर यांचे मूळ गांव. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राध्यापक म्हणून काम सुरू केले.

या शिक्षण संस्थेच्या पंढरपूर, श्रीरामपूर, कराड, कोल्हापूर येथील महाविद्यालयांत त्यांनी काम केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात ते सन १९७९ मध्ये रूजू झाले. या विभागात त्यांनी वीस प्राध्यापक म्हणून, तर सहा वर्षे विभागप्रमुख काम पाहिले. संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, वक्ते आणि विचारवंत अशी त्यांची ओळख होती.

विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी सुमारे ३५ पुस्तकांचे लेखन केले. त्यातील मराठी वाड:मयाचा इतिहास, व्यावहारिक मराठी, प्रबोधनाच्या पाऊलखुणा, आचार्य अत्रे साहित्य दर्शन आदी पुस्तके प्रसिद्ध होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी मराठीतून एम. फिल., पीएचडी पदवी प्राप्त केली. श्री महालक्ष्मी बँकेचे उपाध्यक्षपदी 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर