शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 14:21 IST

येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असून, त्याच माध्यमातून महिला बचत गटांना आपले रोजगार वाढविण्यासाठी पर्यटकांना जास्त आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि योजना राबवू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. त्यांच्या हस्ते येळवण जुगाई परिसरात विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न  : संभाजीराजे येळवण जुगाई येथे विविध विकासकामांचा प्रारंभ

कोल्हापूर : येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असून, त्याच माध्यमातून महिला बचत गटांना आपले रोजगार वाढविण्यासाठी पर्यटकांना जास्त आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि योजना राबवू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. त्यांच्या हस्ते येळवण जुगाई परिसरात विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेले शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई या गावी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुमारे सहा कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.

या आराखड्यातील येळवण जुगाईतील भंडारवाडी, गुरववाडी, चिखलवाडी, मालाईचा धनगरवाडा, पारिवणे तसेच पांढरेपाणी या सर्व वाड्यावस्त्यांवर अंतर्गत रस्ते व गटारी या मंजूर कामांचे उद्घाटन खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते येळवण जुगाई येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अपंगांना व्हीलचेअर्स, कुबड्या आणि श्रवणयंत्राचे वाटपही करण्यात आले. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पांढरेपाणी या ठिकाणी पन्हाळा ते पावनखिंड रस्त्यावर ५० लाख रुपये खर्चून एक बहुद्देशीय सांस्कृतिक हॉलचे बांधकाम खासदार संभाजीराजे यांच्या खासदार निधीतून होत आहे.

या हॉलचा वापर पंचक्रोशीतील कार्यक्रमांना, उत्सवांना आणि समारंभासाठी तर होणार आहेच; पण त्याच पद्धतीने तेथील विविध बचत गटांसाठी विक्रीचे स्टॉलही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पर्यटकांना येथे राहण्याची तसेच भोजनाची सोयही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याप्रसंगी योजनेच्या प्रभारी अधिकारी भाग्यश्री फरांदे, शाहूवाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी वाघमारे आणि वनाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर