शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आॅनलाईन औषध विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:53 IST

आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निदर्शने केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात सुमारे ५०० औषध विक्रेते सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे आॅनलाईन औषध विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’विक्रेत्यांचा मोर्चा : जिल्ह्यातील ५०० औषध विक्रेते सहभागी

कोल्हापूर : आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निदर्शने केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात सुमारे ५०० औषध विक्रेते सहभागी झाले होते.आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात संपूर्ण भारतातील औषध विक्रेत्यांच्या वतीने देशव्यापी ‘हल्लाबोल’ आंदोलन उभारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढला. सकाळी सुभाषरोडवरील सर्व औषध विक्रेते एकत्र आले. त्यांनी प्रथम अन्न व औषध विभागाचे प्रभारी सहआयुक्त शामली महिंद्रकर आणि आरोग्य निरीक्षक महेश गाडेकर यांना निवेदन देऊन मागण्या समोर ठेवल्या.त्यानंतर मोर्चा लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर असेब्ली रोड मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केले. त्यावेळी आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल निदर्शने करण्यात आली. त्यावेळी आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी, दूरचित्रवाणीवर सुरू असणाऱ्या आॅनलाईन औषध विक्रीच्या जाहिराती बंद कराव्यात, अशा घोषणा देण्यात आल्या.आंदोलकांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर यांना निवेदन देऊन आॅनलाईन औषधविक्री कशी धोकादायक आहे, याबाबत सविस्तर कथन केले.

यावेळी शिष्ठमंडळात अखिल भारतीय औषध अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य दिलीप कदम, राज्य केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे संघटक व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव शिवाजी ढेंगे, संजय शेटे, किरण दळवी, खजानिस अशोक बोरगावे, सचिन पुरोहीत, प्रल्हाद खवरे तसेच सर्व संचालक, तालुका असोसिएशनचेपदाधिकारी, केमिस्ट यांचा सहभाग होता.

मागण्या...

  1. औषधांची आॅनलाईन विक्री बंद करावी.
  2. मुंबई उच्च न्यायालयाने आॅनलाईन औषध विरोधात दिलेल्या अहवालाची कार्यवाही करावी.
  3. संचहिन जाहिरातीच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी.
  4. आॅनलाईन कंपन्यांचे मालक, आॅपरेटर, जाहिरात करणारे व त्यात भाग घेणारे कलाकार तसेच कुरीअर कंपन्या यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा.

 

 

 

टॅग्स :medicinesऔषधंcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर