शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अस्थमा, हृदयविकारांचे रुग्ण हैराण, थंडीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 11:24 IST

थंडीचा कडाका थांबण्याचे नाव घेत नसल्याने वयोवृद्ध, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना ही थंडी जीवघेणी ठरत असून ते हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलाने अशाप्रकारचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आणखी दोन दिवस जिल्ह्याचा पारा १० डिग्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ठळक मुद्देअस्थमा, हृदयविकारांचे रुग्ण हैराण, थंडीचा फटका आणखी दोन दिवस पारा १० डिग्रीपर्यंत राहणार

कोल्हापूर : थंडीचा कडाका थांबण्याचे नाव घेत नसल्याने वयोवृद्ध, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना ही थंडी जीवघेणी ठरत असून ते हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलाने अशाप्रकारचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आणखी दोन दिवस जिल्ह्याचा पारा १० डिग्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.संपूर्ण देशभर थंडीची लाट पसरली आहे, उत्तरेकडून थंडीची लाट दक्षिणकडे सरकली आहे. अंगाला बोचणारे वारे रक्त गोठवत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा व खानदेशात थंडीचे प्रमाण जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्राचा पाराही घसरला असून कोल्हापूरचे किमान तापमान १० डिग्रीपर्यंत खाली आले आहे. रोज तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढतच आहे.थंडीचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध रुग्ण व लहान मुलांना होत आहे. विशेषत: अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना थंडी जीवघेणी ठरत आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने शरीरातील रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यातूनच पॅरालिसिसचे शक्यता अधिक असते. थंडीने न्यूमोनिया, सर्दी, खोकला, त्वचारोग, टॉन्सिल सूजणे आदी त्रास सुरू होतात. आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.

  1. थंडीपासून बचाव करण्यासाठी हे करावे
  2. रात्री झोपताना अंगात व पांघरण्यासाठी ऊबदार कपडे वापरावीत.
  3. सकाळी लवकर थंडीत बाहेर पडू नये.
  4. गरम पेय, जेवण घ्यावे.
  5. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दिनक्रम ठरवावा.

तुलनात्मक कोल्हापुरातील तापमान, डिग्रीमध्येदिनांक                     किमान      कमाल       दिनांक                  किमान    कमाल३१ डिसेंबर २०१७         १७             ३२            ३१ डिसेंबर २०१८       १०        २९१ जानेवारी २०१८         १७             ३१             १ जानेवारी २०१९      १०       २९२ जानेवारी २०१८          १७            ३०             २ जानेवारी २०१९      १०       ३०३ जानेवारी २०१८          १६            ३०              ३ जानेवारी २०१९      १२      ३०

गेल्या तीन-चार दिवसांत थंडीचा कडाका वाढला असून त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषत: अस्थमा, हृदयाच्या रुग्णांनी अशा वातावरणात काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. आनंद सूर्यवंशी, वसगडे

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर