शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : शिक्षण समिती सभापतिपदी अशोक जाधव यांची निवड, उपसभापतिपदी सचिन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 17:49 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतिपदी अशोक जाधव (कॉँग्रेस) व उपसभापतिपदी सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित शिक्षण समितीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार होते.

ठळक मुद्देशिक्षण समिती सभापतिपदी अशोक जाधव यांची निवडउपसभापतिपदी सचिन पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतिपदी अशोक जाधव (कॉँग्रेस) व उपसभापतिपदी सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित शिक्षण समितीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार होते.

शिक्षण समिती सभापतिपदासाठी नगरसेवक अशोक जाधव (कॉँग्रेस) व नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील (भाजप) यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभाध्यक्षांनी दोन्ही अर्जांची छाननी केली. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही; त्यामुळे हात वर करून मतदान घेण्यात आले.

यामध्ये अशोक जाधव यांना पाच, तर विजयसिंह खाडे-पाटील यांना चार मते पडली. उपसभापतिपदासाठी नगरसेवक सचिन पाटील (राष्ट्रवादी) व नगरसेविका मेहजबीन सुभेदार (ताराराणी आघाडी) यांचे अर्ज दाखल झाले होते. यावेळी मतदान घेण्यात आले असता पाटील यांना पाच, तर सुभेदार यांना चार मते पडली.शिक्षण समितीचे नूतन सभापती जाधव हे प्रभाग क्रमांक ५ - लक्ष्मीविलास पॅलेस मतदारसंघातून संपूर्ण शहरात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. जाधव स्वत: माध्यमिक शिक्षक आहेत.

नूतन उपसभापती सचिन पाटील हे प्रभाग क्रमांक ३४ - शिवाजी उद्यमनगर मतदारसंघातून नगरसेवक म्हणून महापालिकेवर प्रथमच निवडून आले आहेत. निवडीनंतर पीठासन अधिकारी खेमनार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी अतिरिक्तआयुक्त श्रीधर पाटणकर, सहायक आयुक्त मंगेश शिंदे, प्रशासनाधिकारी शंकर यादव, नगरसचिव दिवाकर कारंडे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, प्रॉ. फंड अधीक्षक उमाकांत कांबळे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर