शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर परिसरात साकारला ‘सॉकर स्ट्रीट’; मॅरेडोना, मेस्सी, झिदान, बॅक हमच्या चित्रांनी रंगल्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:56 IST

खंडोबा तालीम मंडळ व फुटबॉल अकॅडमीतर्फे शिवाजी पेठेतील तालमीच्या परिसरात बुवा चौक ते जुना वाशी नाका या मार्गावरील घरांच्या भिंतींवर ‘सॉकर स्ट्रीट’ साकारण्यात आले. जागतिक फुटबॉलपटलावरील दिग्गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाच्या दियागो मॅरेडोनासह लिओनील मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, झिनेदिन झिदान, नेमार ज्युनिअर अशा एक ना अनेक दिग्गजांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्याचे अनावरण  छत्रपती शाहू व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देकोल्हापूर परिसरात साकारला ‘सॉकर स्ट्रीट’, अकॅडमीचीही स्थापना मॅरेडोना, मेस्सी, झिदान, बॅक हमच्या चित्रांनी रंगल्या भिंती

कोल्हापूर : खंडोबा तालीम मंडळ व फुटबॉल अकॅडमीतर्फे शिवाजी पेठेतील तालमीच्या परिसरात बुवा चौक ते जुना वाशी नाका या मार्गावरील घरांच्या भिंतींवर ‘सॉकर स्ट्रीट’ साकारण्यात आले. जागतिक फुटबॉलपटलावरील दिग्गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाच्या दियागो मॅरेडोनासह लिओनील मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, झिनेदिन झिदान, नेमार ज्युनिअर अशा एक ना अनेक दिग्गजांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्याचे अनावरण  छत्रपती शाहू व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले.परिसरातील आबालवृद्धांनाही फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ‘खंडोबा’ने फुटबॉल संघाचे व्यवस्थापक सतीश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ‘सॉकर स्ट्रीट’ साकारला आहे. यामुळे परिसरात फुटबॉलमय वातावरण निर्माण झाले आहे.शाहू छत्रपती म्हणाले, खेळाबरोबर कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करून पोलीस दलाबरोबरचे ऋणानुबंध कसे आहेत, याची अनुभूती दिली. सॉकर स्ट्रीटच्या संकल्पनेमुळे फुटबॉलच्या प्रसाराबरोबर खेळ भावना वाढून व्यसनमुक्तीही होईल.पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, खेळाचा प्रसार आणि दिग्गज खेळाडूंकडे पाहून त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचण्याची ताकद या चित्रातून मिळेल. आजही ऐतिहासिक नगरीतील शतकोत्तर तालीम असलेल्या ‘खंडोबा’कडून व शाहू छत्रपती यांच्या हस्ते झालेला सत्कार म्हणजे खुद्द महाराजांच्या हस्ते मावळ्यांचा सत्कार झाल्याची माझी भावना आहे.तालमीतर्फे किणी टोलनाक्यावरील चकमकीत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी तानाजी सावंत यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ फुटबॉल मार्गदर्शक अप्पासाहेब वणिरे, अरुण नरके, बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, तालमीचे अध्यक्ष प्रल्हाद पवार, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अभिजित वणिरे यांनी केले.किट घालण्याचा मोहखंडोबा तालीम मंडळाने यंदा अ, ब, क आणि १३ व १५ वर्षांखालील अशा सात संघांकरिता तयार केलेल्या निळ्या रंगाच्या किटचे अनावरण झाले. यावेळी खुद्द शाहू छत्रपतींनाही किट घालण्याचा मोह आवरला नाही. यामुळे उपस्थितांचा आनंद आणखी द्विगुणित झाला.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर