शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

कोल्हापूर : पगारी पुजारी नियुक्ती तात्पूरत्या पर्यायी स्वरुपाची : महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 18:46 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूजेसाठी सध्या सुरू असलेली पुजारी नियुक्ती प्रक्रिया ही तात्पूरती व पर्यायी स्वरुपाची आहे. शासनाने कायद्याची अंतिम अधिसुचना जाहीर केल्यानंतर अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध करून पगारी पुजारी नियुक्त केले जातील अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान मंगळवारपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपगारी पुजारी नियुक्ती तात्पूरत्या पर्यायी स्वरुपाची : महेश जाधव कायद्याच्या अधिसुचनेनंतर अधिकृत जाहिरात

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूजेसाठी सध्या सुरू असलेली पुजारी नियुक्ती प्रक्रिया ही तात्पूरती व पर्यायी स्वरुपाची आहे. शासनाने कायद्याची अंतिम अधिसुचना जाहीर केल्यानंतर अधिकृतरित्या जाहिरात प्रसिद्ध करून पगारी पुजारी नियुक्त केले जातील अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान मंगळवारपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.देवस्थानकडून सुरू असलेली पगारी पुजारी नियुक्ती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप काही संस्था, संघटनांकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पत्रकार परिषदेत अध्यक्ष महेश जाधव व सचिव विजय पोवार यांनी शासनाच्या न्याय व विधी खात्याच्या प्रधान सचिवांसोबत झालेली बैठक व त्यांनी दिलेल्या तोंडी व लेखी सुचनेनुसारच ही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.ते म्हणाले, शासनाने १२ एप्रिल रोजी कायदा संमत केला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी अंतिम अधिसुचना जाहीर केलेली नाही. ही अधिसुचना जाहीर होईल त्यादिवसापासून देवस्थान समिती व परंपरागत पूजाऱ्यांचे मंदिरावरील हक्क संपुष्टात येणार आहेत.

त्यादिवशी विद्यमान पुजारी न्यायालयात जाणार आहेत, या घडामोडीं दरम्यान देवीच्या पूजाअर्चा व विधींमध्ये खंड पडू नये यासाठी पूर्वतयारी आणि पर्यायी व्यवस्था म्हणून या निवडी करण्यात येत आहेत. त्यासाठी जाहिरात काढण्याची परवानगी दिलेली नाही.

नवी समिती नियुक्त होवून त्यांच्याकडे मंदिराचे सर्वाधिकार हस्तांतर होईपर्यंतची सर्व प्राथमिक व्यवस्था देवस्थान समितीकडूनच करण्यात येणार आहे. आंदोलकांनी चुकीच्या गोष्टी गृहीत धरून आंदोलने न करता या बाबी समजून घ्याव्यात व देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.परिषदेस सदस्य बी.एन. पाटील-मुगळीकर, संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, सहसचिव एस.एस. साळवी, मिलिंद घेवारी, राहूल जगताप आदी उपस्थित होते.

विद्यमान पूजाऱ्यांना प्राधान्य..जाधव म्हणाले, कायद्यातील मसुद्यानुसार अधिकृतरित्या पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पूजाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. ते विशिष्ट जातीचे आहेत म्हणून अन्याय केला जाणार नाही. तज्ञांसमोर झालेल्या मुलाखतीत ते पात्र ठरले तर त्यांच्यासह आत्ता निवडल्या जाणाऱ्या पुजाऱ्यांनाही भरती करून घेतले जाईल.

जमीन लाटणाऱ्यांची नावे जाहीर करणार..जाधव म्हणाले, देवस्थानच्या २७ हजार एकर जमिनींपैकी हजारो एकर जमिनी राजकीय नेत्यांनी, कुळांनी लाटल्या आहेत. खंड न भरता जमिनीचा बेकायदेशीर वापर सुरू आहे. हे गैरकारभार केलेल्या व्यक्तींची नावे महिन्याभरात अधिकृतरित्या जाहीर करू.

देवस्थानच्या अटी शर्थींचा भंग करून जमिन हडपणाऱ्यांसाठी विशेष कायदा करण्याची मागणी न्याय व विधी खात्याकडे केली आहे. सध्या अशा व्यक्तींना नोटिसा देवून जमिन काढून घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर