शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महानगरपालिकेपाठोपाठ आता नगरपालिका होणार करोसीनमुक्त, नववर्षात पुरवठा विभागाकडून अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 17:29 IST

कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीनमुक्त करण्यासासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या नववर्षात हे अभियान सुरू करून ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केरोसीनमुक्त झालेल्या लाभार्थ्याला उज्वला अभियानांतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे उज्वला योजनेतून गॅस कनेक्शन देणारअभियान सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन इचलकरंजी नगरपालिकेत काम पोहोचले ९० टक्क्यांंपर्यंत

प्रवीण देसाई

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीनमुक्त करण्यासासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या नववर्षात हे अभियान सुरू करून ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केरोसीनमुक्त झालेल्या लाभार्थ्याला उज्वला अभियानांतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात केरोसीनमुक्तीसाठी पुरवठा विभागाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे केरोसीनमुक्तीचे जवळपास शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. इचलकरंजी नगरपालिकेतही हे काम ९० टक्क्यांंपर्यंत पोहोचले आहे.

येथे केरोसीनचा एक टॅँकर अजून सुरू असून, दोन महिन्यांत तो ही बंद होऊन शंभर टक्केशहर केरोसीनमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील उर्वरित जयसिंगपूर, कुरुंदवाड, वडगाव, हुपरी, गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड या नऊ नगरपालिकांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. नववर्षात याची सुरुवात होणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक यांच्या संयुक्त विद्यमाने व समन्वयाने हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये केरोसीन बंद करताना संबंधित लाभार्थ्याला प्रथम केंद्र सरकारच्या ‘उज्वला’गॅस योजनेंतर्गत गॅसचे कनेक्शन दिले जाणार आहे. अशा लोकांची माहिती संकलित करण्याचे काम गॅस कंपन्यांकडून सुरू आहे.नगरपालिका क्षेत्रात बहुतांश लोकांकडे गॅस कनेक्शन असून, अद्याप काही लोकांकडे कनेक्शन नसल्याने त्यांची मदार ही केरोसीनवर आहे. त्यामुळे अशा लोकांचे केरोसीन बंद करताना त्यांची पर्यायी व्यवस्था करून देणे महत्त्वाचे आहे. यासाठी केरोसीनमुक्तीबरोबरच संबंधितांना गॅस कनेक्शन दिले जाणार आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला बैठक होणार असून, यामध्ये पुरवठा विभागाचे अधिकारी, गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. 

कोल्हापूर महानगरपालिका केरोसीनमुक्त झाली आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील नगरपालिका केरोसीनमुक्त करण्याचे अभियान या नववर्षात राबविले जाणार आहे. हे अभियान येत्या चार ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न राहणार आहे.- विवेक आगवणे,जिल्हा पुरवठा अधिकारी 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार