शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर प्रशासनाची ‘निवडणूक’घाई ! उद्यापासून आचारसंहितेची शक्यता -लोकसभेचे पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:47 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या, शनिवारी लागणार असल्याची कुणकुण लागल्याने गुरुवारी दिवसभर जिल्हा प्रशासनात एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीस सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे निधी, फाईलींचा निपटारा

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या, शनिवारी लागणार असल्याची कुणकुण लागल्याने गुरुवारी दिवसभर जिल्हा प्रशासनात एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीस सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समितीत अखर्चित निधी अन्य विभागांकडे वळविण्यासाठी लगबग वाढली.

महत्त्वाच्या फाईल आचारसंहितेत अडकू नयेत म्हणून स्वत: जातीनिशी उपस्थित राहून काम करवून घेणाऱ्यांची वर्दळ दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात दिसत होती. व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा निधी संबंधित लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यासाठी धावपळ सुरू होती.जिल्हा नियोजन विभागास मंत्रालयातून आचारसंहितेबाबत पूर्वकल्पना मिळाल्याने निधी खर्ची टाकण्याबाबत प्रक्रिया सुरू होती. समितीला या वर्षी २६३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १९२ कोटी रुपये यापूर्वीच आले आहेत; तर ७१ कोटींचा निधी फेब्रुवारीअखेरच्या कालावधीत प्राप्त झाला आहे. यापूर्वी आलेल्या निधीपैकी महसुली खर्च ७१ टक्के झाला आहे, तर भांडवली खर्च अजून ४८ टक्क्यांवरच आहे.

निधीमधील ७१ कोटी रुपये उशिरा प्राप्त झाल्याने टेंडर प्रक्रियेतच बराचसा वेळ गेला आहे. त्यामुळे हा निधी अखर्चित राहून परत जाऊ नये यासाठी नियोजन समिती दक्षता घेत आहे. अखर्चित निधी मागणीच्या प्राधान्यानुसार अन्य विभागांकडे वळविण्यावर भर दिला आहे.बुधवारी (दि. ६) दिवसभर संपूर्ण विभागात कर्मचारी बिले मंजुरीच्या कामातच व्यस्त दिसत होते. प्रत्यक्ष आचारसंहिता जाहीर होईपर्यंत ही कामे करीतच राहण्याच्या सूचना जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणा राबत आहे. रात्री उशिरापर्यंत कामे सुरूच होती. एकूणच शासकीय कार्यालयात आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक घाई दिसून आली.‘निवडणूक’ सुरळीत पार पाडा : देसाईकोल्हापूर : प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, प्रत्येकाने प्रशिक्षण आत्मसात करून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार काम करावे. निवडणूक कामकाज विविध चार टप्प्यांत विभागले जाते. निवडणूकविषयक काम करताना अधिकारी व कर्मचाºयांनी घाबरून न जाता आनंदाने हे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.

राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय समित्यांसाठी पहिले प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, आदी प्रमुख उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा स्तरांवर नेमलेल्या विविध समित्यांनी करावयाच्या कामकाजाची आणि त्याअनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे, सहायक निवडणूक खर्च निरीक्षक बाबा जाधव यांनी दिली. हातकणंगलेच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आभार मानले.दररोज दोन तास संकेतस्थळाचे वाचन करासर्व समित्यांची माहिती व त्याचे कामकाज हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिले आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी दिवसातून किमान दोन तास निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून समितीच्या कामकाजाबाबत वाचन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी