शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

कोल्हापूरात प्रशासन दक्ष;‘बीएलओ’ सुस्त, मतदार यादीतील कामांकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 16:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात प्रशासन दक्ष;‘बीएलओ’ सुस्त, मतदार यादीतील कामांकडे कानाडोळासाडे तीन लाख रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम प्रलंबित

प्रवीण देसाई

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

यामध्ये नावनोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे आदी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)च्या माध्यमातून करायची आहेत. परंतु हे ‘बीएलओ’ नेमके असतात कसे व ते कधी घरी येऊन जातात हा सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न आहे. याबाबत राजकीय कार्यकर्त्यांनीही आक्षेप घेतले आहेत. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासन दक्ष असले तरी ‘बीएलओ’ मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे.प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेली आहे. ती नागरिकांसाठी मतदान केंद्रावर, तहसीलदार कार्यालय, तसेच कोल्हापूर महानगरपालिका येथे तपासून आपल्या नावाची खात्री करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदार यादीत नाव नसेल तर तो भरुन नमुना क्र. ६ चा फॉर्म आवश्यक पुराव्यासह भरून द्यावा. यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर ४ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने युध्दपातळीवर काम सुरु केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत.

एका बाजूला हे चित्र असले तरी तळागाळात मतदार यादीसंदर्भात जे प्रत्यक्ष काम करतात ते ‘बीएलओ’ मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता ‘बीएलओ’ हे बहुतांश ठिकाणी मतदारांच्या घरात गेलेले नाही. परिणामी काही दिवसांपूर्वी दौऱ्यावर आलेल्या विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासमोर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ‘बीएलओ’ घरोघरी जात नाहीत. तसेच गेले असतील तर ते वरवर फेरी मारत असल्याचे दिसत आहे.

कारण मतदार यादीत तब्बल ३ लाख ६५ हजार २१२ रंगीत छायाचित्रे समाविष्ट करण्याचे काम प्रलंबित आहे. ३१ आॅक्टोंबरपर्यंतच हे काम करायचे असून इतक्या अल्प कालावधिमध्ये हे काम पूर्ण होणार का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

‘बीएलओं’बाबत जिल्हा प्रशासन गंभीर‘बीएलओं’च्या चालढकल कारभाराबाबत जिल्हा निवडणूक विभाग गंभीर आहे. त्यांनी याबाबत वेळोवेळी निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनीही ‘बीएलओं’च्या कामातील कुचराईबद्दल काही ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केल्याची आठवण कोल्हापूरात करुन दिली आहे. तरीही ‘बीएलओ’ मतदारांपर्यंत पाहोचण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे.

३ लाख ६५ हजार २१२ रंगीत छायाचित्रांचे काम प्रलंबितप्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या २९ लाख ६३ हजार३१४ इतकी आहे. छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या २९ लाख ६४ हजार ८२४, छायाचित्र नसलेल्यांची संख्या ४९०, कृष्ण धवल छायाचित्र असलेले मतदार ५ लाख २२ हजार ९१५, रंगीत छायाचित्र असलेले मतदार १ लाख ५७ हजार ७०३ तर रंगीत छायाचित्र नसलेले मतदार ३ लाख ६५ हजार २१२ आहेत. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर