शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जादा भाडे आकारणी करणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर्सवर ‘आरटीओ’ ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 12:48 IST

दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेत खासगी कंत्राटी बसचालक कमाल भाड्यापेक्षा जादा भाडे आकारतात. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशा ट्रॅव्हलर्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला.

ठळक मुद्देजादा भाडे आकारणी करणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर्सवर ‘आरटीओ’ ची कारवाईकारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू

कोल्हापूर : दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेत खासगी कंत्राटी बसचालक कमाल भाड्यापेक्षा जादा भाडे आकारतात. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशा ट्रॅव्हलर्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला.राज्यातील खासगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर राज्य शासनाने २७ एप्रिल २०१८ च्या निर्णयानुसार ठरवून दिले आहेत. तरीही काही ट्रॅव्हलर्स त्या दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणी करीत आहेत. सदर कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच प्रकारच्या बसेसच्या टप्पा वाहतुकीच्या सद्य:स्थितीच्या प्रति कि. मी. भाडेदरापेक्षा ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही, असे निश्चित केले आहे. तरीसुद्धा गर्दीचा फायदा घेत अनेक खासगी ट्रॅव्हलर्स अवाजवी भाडे आकारत आहेत.

याबद्दल राज्याच्या परिवहन आयुक्तांनी कारवाई करण्याबद्दलचे आदेश मंगळवारी (दि. ६) सायंकाळी काढले. त्यानुसार बुधवारी दुपारपासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा ट्रॅव्हलर्सविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार कारवाईस सुरुवात करीत नियमानुसारच भाडे स्वीकारण्यास अनेक ट्रॅव्हलर्सना भाग पाडले.

या कारवाईत स्वत: प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अलावारीस, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे, मोटारवाहन निरीक्षक असिफ मुल्लाणी, सुभाष देसाई, आदींनी सहभाग घेतला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर