शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कोल्हापूर : जिल्हा बॅँक कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस तर संस्थांना ८ टक्के लाभांश : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:00 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाला असून कर्मचाऱ्यांना तब्बल बारा वर्षांनंतर ८.३३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. त्याचबरोबर संलग्न संस्थांनाही ८ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस तर संस्थांना ८ टक्के लाभांश : हसन मुश्रीफ ५७.५६ कोटी ढोबळ नफा, व्यवस्थापन खर्चातही कपात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाला असून कर्मचाऱ्यांना तब्बल बारा वर्षांनंतर ८.३३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. त्याचबरोबर संलग्न संस्थांनाही ८ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, आर्थिक वर्षात सहा हजार कोटींच्या ठेवी, शंभर कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले, पण नोटाबंदीतील २५.२७ कोटींचे व्याज मिळाले नाही. साखर उद्योग अडचणीत आल्याने ठेवींवर परिणाम झाल्याने उद्दिष्ट गाठता आले नाही तरीही ४०५३ कोटींच्या ठेवी, ३०११ कोटींचे कर्जवाटप केले. त्यातून ५७.५६ कोटी ढोबळ नफा झाला आहे.

बॅँकेचा व्यवस्थापन खर्च कमी करण्यात यश आले असून २.१९ टक्के झाला. ‘सीआरएआर’ (भांडवल पर्याप्तता) १२.५५ टक्के राखण्यात यश आले आले. ढोबळ नफ्यातून तरतुदी करून यावर्षी कर्मचाºयांना ८.३३ टक्के बोनस देणार आहे. संस्थांना गेल्यावर्षी ४ टक्के लाभांश दिला होता यावर्षी ८ टक्के देणार आहे. यावेळी संचालक उपस्थित होते.

रोजंदारींना ‘प्रोबेशनल आॅर्डर’शंभर कोटी नफा आणि व्यवस्थापन खर्च २ टक्क्यांच्या आत आला असता तर रोजंदारी व अनुकंपाखालील कर्मचाऱ्यांची कायम नेमणूक केली असती तरीही कर्मचाऱ्याबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. संचालकांशी चर्चा करून त्यांना वर्ष-दोन वर्षाची ‘प्रोबेशनल आॅर्डर’ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘शेड्युल्ड दर्जा’साठी ‘नाबार्ड’कडे पाठपुरावाबॅँक सक्षम झाली असून ‘शेड्युल्ड दर्जा’ मिळविण्यासाठी ‘नाबार्ड’ला ठराव पाठविणार आहे. त्यामुळे मध्यस्थी बँक कमी होऊन थेट रिझर्व्ह बँकेशी व्यवहार करता येणार आहे. ग्राहकांना शासनाच्या अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

खट्याळ संस्थांची वसुलीदहा संस्थांकडे ७८ कोटींची थकबाकी असून ढोल-ताशे वाजवूनही वसुली झालेली नाही. या खट्याळ संस्थांच्या संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवून वसूल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

...तर दुप्पट बोनसबॅँकेच्या १८३ शाखा नफ्यात असून केवळ ८ शाखा तोट्यात आहेत. दीर्घकाळ थकबाकी असलेल्या १७ संस्थांची थकबाकी वसूल झाली आहे. कर्मचारी, संचालकांच्या प्रयत्नांमुळे बॅँक सक्षम झाली असून शंभर कोटी नफा झाला तर कर्मचाऱ्यांना ८.३३ का दुप्पट बोनस देऊ, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

हे करणार-

  1. ‘सीबीएस’ प्रणाली
  2. कोल्हापूर, इचलकरंजी येथे ‘ई-लॉबी’कार्यरत करणार
  3. सक्षम विकास संस्थांच्या माध्यमातून ‘मायक्रो-एटीएम’ सेवा
  4. अपात्र ११२ कोटींचा विषय निकालात काढणे
  5. राष्यीकृत, खासगी बॅँकांप्रमाणे कर्जपुरवठा, शहरातील ग्राहक केंद्रबिंदू
  6. ठिबकला जास्तीत जास्त कर्जपुरवठा
  7. सर्व शाखा नफ्यात आणणार
  8. व्यक्तिगत अपघात विमा योजना

 

दृष्टिक्षेपात बँकेची भरारी-तपशील         मार्च २०१७              मार्च २०१८भागभांडवल  १६५.४६ कोटी          १७६.२३ कोटीठेवी               ३६३९.४३ कोटी       ४०५३.३७ कोटीकर्जे वाटप     २५४७.२० कोटी      ३०११.०५ कोटीढोबळ नफा   १२.४६ कोटी              ५७.५६ कोटीव्यव. खर्च       २.३८ टक्के             २.१९ टक्केसीआरएआर    १०.७० टक्के         १२.५५ टक्के

 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफbankबँकkolhapurकोल्हापूर