शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

‘कोजिमाशि’ सभेत गोंधळाची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:38 IST

प्रश्न विचारण्यावरून होणारी झटापट, पोलिसांचा हस्तक्षेप, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे नेहमी गाजणाºया ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या यंदाच्या सभेने मागील परंपरा खंडित केली. तब्बल अडीच तास झालेल्या विविध विषयांवर चर्चेतून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपातीबरोबरच २५ लाखांच्या कर्जमर्यादेला सभेने मान्यता दिली.

ठळक मुद्देकर्जावर अर्धा टक्का व्याज कपात अडीच तास विविध विषयांवर चर्चा‘सोनू, तुझा दादावर भरोसा नाय काय...?’ हे गीत सादर करून विरोधकांना चिमटा

कोल्हापूर : प्रश्न विचारण्यावरून होणारी झटापट, पोलिसांचा हस्तक्षेप, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे नेहमी गाजणाºया ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या यंदाच्या सभेने मागील परंपरा खंडित केली. तब्बल अडीच तास झालेल्या विविध विषयांवर चर्चेतून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपातीबरोबरच २५ लाखांच्या कर्जमर्यादेला सभेने मान्यता दिली. शेरोशायरी, ‘सोनू’ गाण्याने सभागृहातील वातावरण चांगलेच हलकेफुलके झाले.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी सभापती संजय डवर होते. संस्थेचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी गेल्या अडीच वर्षांत केलेल्या वचनपूर्तीचा आढावा घेत, शेवटच्या सभासदाचे समाधान केल्याशिवाय सभा संपविणार नाही. शांततेने प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.

सभापती संजय डवर यांनी तडाखेबंद प्रास्ताविकात सभासदांना खिळवून ठेवले. सभासदांची मागणी लक्षात घेऊन १ आॅक्टोबरपासून त्यांनी कर्जावरील व्याजदर अर्धा टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली. कर्जातील काही रकमेची परतफेड केल्यानंतर त्याचा हप्ता कमी करण्याची मागणी दिलीप शेटे यांनी केली. यावर कायदा आडवा येतो, कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेऊ, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यानंी सांगितले.

सोनेतारण योजना चांगली असली तरी त्यातून होणाºया फसवणुकीबाबत संस्थेने जागरूक राहण्याचा सल्ला संभाजी खोचरे यांनी दिला. एकाच वर्षात शाखा इमारती खरेदी करण्यामागे कारण काय? शाहूपुरी शाखा इमारत किती कोटींना घेतली, अशी विचारणा संजय पाटील यांनी केली. दहावी-बारावीमधील गुणवंतांबरोबर ‘नीट’, ‘जेई’ प्रवेश परीक्षांमधील गुणवंतांना पारितोषिक द्यावे, अशी मागणी प्रा. बी. डी. लोंढे यांनी केली. त्यास तत्काळ मंजुरी देण्यात आली.

आपल्या खास शैलीत संजय परीट यांनी सभागृहातच ‘सोनू, तुझा दादावर भरोसा नाय काय...?’ हे गीत सादर करून विरोधकांना चांगलाच चिमटा घेतला. कर्जावरील व्याज दर कमी करण्याबरोबरच उच्चांकी नफ्याबद्दल दादासाहेब लाड व संचालकांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला. सी. बी. चव्हाण, धोंडिराम बाबर, डी. आर. पाटील, संजय ओमासे, अशोक मानकर, शिवाजी चौगुले, शंकरराव गुरव, मच्छिंद्र शिरगावकर, अंकुश कवडे, पी. आर. पाटील, राजेंद्र पाटील, शंकर पाटील, सरदार काळे, आर. बी. पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी केले. उपसभापती आनंदराव काटकर यांनी आभार मानले.

राधानगरी शाखेचा गुंता कायम

राधानगरी तालुक्यातील शाखा कोठे करायची ती करा; पण लवकर निर्णय घ्या, असे सुरेश खोत यांनी सांगितले. कसबा तारळेत शाखा करण्याची मागणी सिकंदर जमाल यांनी लावून धरली; तर सरवडे परिसरात २८ शाखा असून तेच सभासदांना सोईचे ठिकाण असल्याचे जे. पी. जाधव यांनी सांगितले.

महिलांची उपस्थिती आणि प्रश्नही!सभेत होणाºया गोंधळामुळे महिला सभासद सभेत प्रश्न विचारायचे राहू देत; उपस्थितही राहत नव्हत्या; पण या वेळेला बोटांवर मोजण्याइतक्या असेना, पण महिला सभासद उपस्थित होत्या. त्यांतील हेमलता पाटील (खांडेकर हायस्कूल, कोल्हापूर) यांनी महिला दिनानिमित्त मुदतबंद ठेव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावर ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ही योजना येथून पुढे कायमस्वरूपी सुरू राहील, असे दादासाहेब लाड यांनी सांगितले.सभापतिपदाची खांडोळी नकोतसभापतिपदाची सहा महिन्यांनी खांडोळी न करता अहवाल सालासाठी एकच सभापती असावा. दुसºया जिल्ह्यात बदली झालेल्या संचालकांनी नैतिकता स्वीकारून कार्यमुक्त व्हावे, अशी मागणी अण्णासाहेब चौगुले यांनी केली.

रानमाळे शांत म्हणजे सगळे अलबेल!विरोधी संचालक राजेंद्र रानमाळे शांत बसल्याचे पाहून, ‘रानमाळे सर गेला दीड तास शांत बसलेत म्हणजे संस्थेचा कारभार निश्चितच अलबेल दिसतो. कदाचित ते लाड सरांच्या प्रेमात पडले असावेत!’ असा टोला संजय परीट यांनी हाणला.

सभासदांसाठी हे करणार -कर्ज परतफेडीची मुदत - पंधरा वर्षेचिरंतन ठेवीवर ५० टक्के कर्ज देणारसोनेतारण कर्ज योजना सुरू करणार

या झाल्या मागण्या -शेअर्स मर्यादा ५० हजार करा.सभासदांच्या पाल्यांना बिनव्याजी लॅपटॉप द्या.सेवानिवृत्तांना आजीव सभासद म्हणून ठेवा.मुख्याध्यापकांच्या सहीशिवाय कर्जमंजुरी द्या.एटीएम सुरू करा.पाच हजार ठोक मानधनावर नोकरभरती करा.कर्जमुक्तीतील सभासदांचा हिस्सा परत करा.