यावेळी गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अमरसिंह पाटील यांचा सत्कार लक्ष्मण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. साखर कारखान्याकडून एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना एकरकमी मिळावी अशी सूचना उदयसिंह पाटील यांनी केली. यावेळी विलास पाटील, संभाजी मुदगल, मस्के यांनी विविध सूचना केल्या. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सचिन जाधव, रघुनाथ चौगुले, अभिजित पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, संतोष गायकवाड, अशोक पोवार, बाळासाहेब माने, दिलीप गायकवाड, विवेक जाधव, श्रीपतराव पाटील, मनोहर पाटील, लक्ष्मी चौगुले, वैजयंती हुजरे यांच्यासह सभासद आभासी पद्धतीने सभेस उपस्थित होते. अहवाल वाचन कार्यक्रम पत्रिका सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष माने यांनी केले. मनोहर पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळ
कोडोली, ता. पन्हाळा येथील दी कोडोली अर्बन को-ऑप. बँकेच्या वार्षिक सभेत राहुल पाटील यांनी संबोधित केले. यावेळी अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील, लक्ष्मण कुलकर्णी, सचिन जाधव, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.