शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

एक पोर अन् गावाला घोर

By admin | Updated: April 8, 2015 00:30 IST

तिसऱ्या अपत्यावरून रामायण : आजरा तालुक्यातील मजेशीर किस्सा

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -गावच्या पोलीसपाटलाला पोरगा झाला. कुटुंबीय सर्व आनंदात असतानाच हे अपत्य ‘तिसरे’ असल्याचे काही मंडळींच्या लक्षात आले. पाटलाच्या विरोधकांनी पाटील पदावरूनच त्याला बाजूला करण्याचा चंग बांधला आहे. याच कारणावरून बाळाच्या आईचे अंगणवाडी सेविकापदही धोक्यात आणण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. कागदी घोडे तालुकापातळीवरून जिल्हा पातळीवर नाचू लागल्याने याची मजेशीर चर्चा सध्या सुरू झाली आहे.गावच्या पोलीसपाटलाचा आब बघून अनेकांची नजर या पदावर आहे. भरीस भर म्हणून पत्नीही अंगणवाडी सेविका. तिसरे अपत्य झाल्यानंतर एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची संधी विरोधकांना आयती सापडली. पोलीसपाटीलही बेरका माणूस. त्याला तिसरे अपत्य झाल्याचा गावकऱ्यांचा दावा, तर आपणाला तिसरे अपत्यच नाही, असा आरोप पाटील व अंगणवाडी सेविकेचे म्हणणे. तक्रार थेट तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवरून. तिसरे अपत्य झाले असल्याचे पुरावे सादर करण्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे.तिसरे अपत्य झाल्याचा पुरावा गावकऱ्यांना सापडेना. अपत्य झाले, पण कागदोपत्री पुरावा नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे, तर पुरावा द्या, कारवाई करतो अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका. गेले तीन महिने हा प्रकार सुरू आहे. या सर्व प्रकारात अधिकारी वर्ग मात्र नाहक अडचणीत आला आहे. ‘पोलीसपाटलाचं एक पोर अखंड गावासह अधिकाऱ्यांच्या जिवाला घोर’ अशी अवस्था सध्या झाली आहे.