शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कुरुंदवाडची ज्ञानसंपदा ‘नगर वाचनालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:42 IST

गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : १२५ व्या वर्षपूर्तीकडे वाटचाल करणारे व संस्थानिकांनी सुरू केलेले ‘नगर वाचनालय’ ...

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : १२५ व्या वर्षपूर्तीकडे वाटचाल करणारे व संस्थानिकांनी सुरू केलेले ‘नगर वाचनालय’ आजही शहर व परिसरातील वाचक व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी ज्ञानगंगा ठरत आहे. सव्वाशे वर्षांत वाचनालयाचे तीन वेळा नामकरण बदलले असले तरी ज्ञानाचा दरवळ मात्र कमी झालेला नाही. संदर्भ विभाग, बाल विभाग, महिला विभाग, ग्रंथालय, वृत्तपत्रे व नियतकालिके, अभ्यासालय अशा विविध विभागातून वाचकांना ज्ञानरुपी खरा मित्र मिळाला आहे.कुरुंदवाड शहर हे संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन सरकार यांच्या अधिपत्याखालील संस्थान होते. संस्थानिक कला, क्रीडा व शिक्षणप्रेमी होते. त्यामुळे त्यांच्या दरबारी अनेक थोर पंडित, संगीतकार, गायक, कलावंत, मल्ल यांना राजाश्रय होता. चिंतामणराव पटवर्धन यांचे ज्येष्ठ चिरंजीव भालचंद्र यांनी बनारस विद्यापीठातून संस्कृत विषयाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी रयतेला मोफत ज्ञान घेता यावे व राज्यातील घडामोडींची माहिती मिळावी, या उद्देशाने १६ आॅक्टोबर १८९८ रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर राजवाड्यातच स्टेट लायब्ररी या नावाने वाचनालय सुरू केले.भालचंद्र पटवर्धन सरकारांनी सुरुवातील दहा वृत्तपत्रे, सात मासिके व एक हजार ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली. त्यावेळी केवळ पंधरा सभासद संख्या होती. सुमारे पंधरा वर्षापर्यंत वाचनालयाचा संपूर्ण कारभार सरकारी मदतीवरच सुरू होता.संस्थापक चिंतामणराव पटवर्धन यांच्या निधनानंतर १९२६ मध्ये राजमाता आईसाहेब महाराज यांच्या कारकिर्दीत वाचनालयाच्या सभासदांच्या विशेष सभेतून अध्यक्ष निवडून सरकारी लायब्ररी लोकाभिमुख केली. १९४० मध्ये भालचंद्र पटवर्धन यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी १९४२ साली वाचनालयाचा महोत्सव कार्यक्रम घेतला. त्यावेळी वाचनालयाचे स्टेट लायब्ररी हे नाव बदलून राजा सर रघुनाथराव पंत सचिव वाचनालय असे नामकरण केले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वाचनालयाने लोक प्रबोधनाचे कार्य उत्तमरित्या केले. दैनिक, साप्ताहिक, मासिके यांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचे स्पुर्लिंग तेवत ठेवले.देश स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली संस्थान संघराज्यात विलीन झाले. त्यामुळे १९४९ साली वाचनालयाची सर्वसाधारण सभा घेवून राजा सर रघुनाथराव पंत सचिव वाचनालय हे नाव बदलून ‘नगर वाचनालय’ असे करण्यात आले.१९९५ पासून या वाचनालयाची ‘अ’ वर्गाच्या यादीत गणना झाली आहे. संस्थेची दोनमजली इमारत असून त्यामध्ये कार्यालय, संदर्भ विभाग, बाल विभाग, महिला विभाग, ग्रंथालय विभाग, वृत्तपत्रे व नियतकालिके विभाग, अभ्यासालय, सभागृह असे विविध विभाग आहेत.वाचनालयाचा उपयोग केवळ पुस्तक, वृत्तपत्रे वाचनापुरतेच मर्यादित न ठेवता लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी संस्थाचालकांकडून विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. यामध्ये २०१२ पासून विद्यार्थ्यांना एमपीएससी व युपीएससीकरिता स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू केले आहे.प्रत्येक वर्षी शरद व्याख्यानमाला, काव्य गायन स्पर्धा, प्रवचने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वाचन सप्ताह असे विविध उपक्रम राबविले जातात.वाचनालयास भेटी दिलेले प्रमुख मान्यवरमाजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती बी. डी. जत्ती, साहित्यसम्राट न. चि. केळकर, माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड, महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय द. वा. पोतदार, ना. ग. गोरे, राजेसाहेब भोर संस्थान, थोर विचारवंत बाळासाहेब भारदे, दे. भ. डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार, नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, कुलगुरू आप्पासाहेब पवार, चि. वि. जोशी, वि. द. घाटे, द. ना. धनागरे, जयंत नारळीकर, ज्ञानेश्वर मुळे, डॉ. रत्नाकर महाजन, विजया वाड.संचालक मंडळविनया घोरपडे (अध्यक्ष), अरुण फडणीस (उपाध्यक्ष), अल्लाउद्दीन दानवाडे (कार्याध्यक्ष), भाऊसो सावगांवे (उपकार्याध्यक्ष), सदस्य - मारुती कोकाटे, भूपाल दिवटे, विजयसिंह भोसले, उमेश पागे, प्रकाश पाटील, सच्चिदानंद आवटी, सुश्मिता पटवर्धन, रमाकांत हुद्दार, अनिल चव्हाण. सेवक वर्ग - दत्तात्रय भोसले (ग्रंथपाल), मेघा पाटील (सहा. ग्रंथपाल), नरसिंह नाईक (लिपिक), शिरीष जोशी (शिपाई).शरद व्याख्यानमाला : संस्थेचे आश्रयदाते एकनाथ वासुदेव छत्रे यांच्यातर्फे २ लाख इतक्या देणगी रकमेच्या व्याजातून त्यांचे मामा स्व. पद्मश्री पां. वा. गाडगीळ व स्व. डॉ. स. रा. गाडगीळ यांच्या स्मरणार्थ सन २०१२ पासून प्रत्येक वर्षी सात दिवसांची शरद व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे.