शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘केएमटी’स ७० लाखांचा फटका, महापुराचा झटका : आठवड्यात फक्त २५ बसेस धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:00 IST

कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला असून त्याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागालाही (केएमटी) मोठ्या प्रमाणात बसला आहे. महापुराने थैमान घातले असताना शहराबाहेर जाणारे सर्वच रस्ते बंद राहिल्याने केएमटीच्या अवघ्या २५ बसेस शहरांतर्गत फिरत होत्या. त्यामुळे आठवड्यात सुमारे ७० लाख रुपयांचा फटका केएमटीला सोसावा लागला आहे.

ठळक मुद्दे‘केएमटी’स ७० लाखांचा फटका, महापुराचा झटका : आठवड्यात फक्त २५ बसेस धावल्या

कोल्हापूर : कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला असून त्याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागालाही (केएमटी) मोठ्या प्रमाणात बसला आहे. महापुराने थैमान घातले असताना शहराबाहेर जाणारे सर्वच रस्ते बंद राहिल्याने केएमटीच्या अवघ्या २५ बसेस शहरांतर्गत फिरत होत्या. त्यामुळे आठवड्यात सुमारे ७० लाख रुपयांचा फटका केएमटीला सोसावा लागला आहे.गेल्या आठवडाभरात शहरात महापुराने थैमान घातल्याने अनेकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातून शहराकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर पुराचे पाणी आल्याने सर्वच रस्ते बंद राहिले. केएमटीकडे सध्या १२९ बसेस आहेत. त्यातील सुमारे १२० बसेस नेहमीच प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असतात. पण महापुरामुळे शहराभोवतीचे सर्वच रस्ते बंद राहिले.

परिणामी, केएमटीच्या अवघ्या २५ बसेस आठवडाभर प्रवाशांना सेवा देण्यासाठी शहरांतर्गत धावत होत्या; तर १० बसेस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे दिल्या होत्या. कमी बसेस धावल्याने आठवडाभरात सुमारे ७० लाख रुपयांचा फटका केएमटी प्रशासनास बसला आहे.सध्या महापूर ओसरू लाागला आहे, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीस खुले झाले आहेत. पण तरीही चालकांअभावी बुधवारी फक्त ४० बसेस मार्गावर धावत होत्या. केएमटीचे अनेक वाहक व चालक ग्रामीण भागात राहत आहेत. सध्या महापुराचे पाणी ओसरू लागले असले घरामध्ये शिरलेले पाणी काढण्यात, घराची स्वच्छता करण्यात केएमटीचे चालक व्यस्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील केएमटीचे चालक अद्याप नोकरीवर हजर झालेले नाहीत.सणादिवशी ८० बसेस धावल्या गुरुवारी १५ आॅगस्ट स्वातंत्रदिन आणि रक्षाबंधनाचा सण असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामीण भागातील चालकांना नोकरीवर हजर होण्याच्या सूचना केएमटी प्रशासनाने दिल्या. त्यामुळे  गुुरुवारी सुमारे ८० बसेस मार्गावर धावल्या.

संपूर्ण शहराला महापुराचा विळखा असल्याने केएमटीच्या बसेस आठवडाभर शहराबाहेर धावू शकल्या नाहीत; त्यामुळे आठवड्यात केएमटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता रस्ते सुरू झाल्याने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत केएमटीच्या फेऱ्या वाढविणार आहे.- संजय भोसले, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिका