कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा, यासह विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनतर्फे केएमटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा दिला आहे.पसप्टेंबर २०१९ चा देय पगार मिळावा, महागाई भत्ता द्यावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, ठोक मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत, बस दुरुस्तीसाठी पैसे मिळावेत आदी मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून देय असलेले दोन कोटी ७६ लाख केएमटी प्रशासनास मिळणार आहेत. यातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची एक कोटी देणी द्यावी, बस दुरुस्तीसाठी ६३ लाख रुपयांची तरतूद करावी; अन्यथा केएमटी कर्मचारी कोणत्याही क्षणी कामबंद आंदोलन करतील. निवेदनावर युनियनचे अध्यक्ष शशिकांत पाटील, इर्शाद नायकवाडी, अनिल कदम यांच्या सह्या आहेत.
केएमटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:33 IST
Kmt Kolhapur News: केएमटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा, यासह विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनतर्फे केएमटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा दिला आहे.
केएमटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा
ठळक मुद्देकेएमटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशाराविविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित