शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

कोल्हापूरहून जोतिबा, पन्हाळा मार्गावर केएमटी बससेवेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:05 IST

राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत (केएमटी)  कोल्हापूरातून जोतिबा आणि पन्हाळा या दोन मार्गावर बससेवेस शनिवारपासून प्रारंभ झाला.

ठळक मुद्देकोल्हापूरहून जोतिबा, पन्हाळा मार्गावर केएमटी बससेवेस प्रारंभमहापौरांनी केला पहिला प्रवास

कोल्हापूर : राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवाढीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत (केएमटी)  कोल्हापूरातून जोतिबा आणि पन्हाळा या दोन मार्गावर बससेवेस शनिवारपासून प्रारंभ झाला.कोल्हापूरात सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका समारंभात महापौर सरिता मोरे यांनी श्रीफळ वाढवून या दोन्ही बस मार्गस्थ केल्या. यावेळी परिवहन समितीचे सभापती राहुल चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, परिवहन समिती सदस्य तसेच अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक आदी उपस्थित होते.पन्हाळा बसस्थानकावर झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या उपस्थितीत बस मार्गस्थ करण्यात आली, तर जोतिबा येथे ग्रामपंचायतीच्या आवारात उपसरपंच जगन्नाथ दादर्णे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कोल्हापूरकडे जाणारी के.एम.टी. बस मार्गस्थ करण्यात आली.कोल्हापूर बसस्थानकावरुन सकाळी ७.४५ वाजता पहिली फेरी सुटणार असून त्यानंतर १.१५, ३.१५, ५.४५ आणि रात्री ८.१५ वाजता मुक्कामाची बस मार्गस्थ होणार आहे, तर पन्हाळा येथून सकाळी ६.३0 वाजता पहिली फेरी निघणार असून त्यानंतर स. ९.00, ११.३0, ४.३0 आणि रात्री ७ वाजता शेवटची फेरी कोल्हापूरकडे निघणार आहे.तसेच कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरून सकाळी ८.२५ , १०.५५ , दुपारी ३ .१५ , सांय ६.२५ आणि रात्री ८.५५ वाजता मुक्कामाची बस जोतिबाकडे मार्गस्थ होणार असून जोतिबा डोंगर येथून रोज सकाळी ६.४५, ९.४० , दुपारी १२ .१०, ४ .१० आणि रात्री ७.४० वाजता ही बस कोल्हापूरकडे मार्गस्थ होणार आहे.असा असेल मार्गया दोन्ही बसेस मध्यवर्ती बसस्थानकावरून रेल्वे स्टेशन मार्गे बिंदू चौक, शिवाजी पुतळा, टाऊन हॉल, शिवाजी पूल, केलीमार्गे पन्हाळा आणि जोतिबा डोंगराकडे धावणार आहे. या मार्गावरील परतीच्या प्रवासात पन्हाळा आणि जोतिबा डोंगरावरून निघालेली ही केएमटी केर्ली, शिवाजी पूल, गंगावेश, महानगरपालिका, टॉऊन हॉल, रेल्वे स्टेशनमार्गे मध्यवर्ती बसस्थानकावर पोहचणार आहे.असे असेल तिकिट, आणि बस पास सवलत कोल्हापूर ते पन्हाळा प्रवासासाठी ३0 रुपये तर जोतिबासाठी २८ रुपये तिकिट असणार आहे. एका दिवसाच्या पाससाठी ३५ रुपये आकारण्यात येणार आहे.या के.एम.टी. बस सेवेमुळे भाविक, प्रवाशांना जलद व सुलभ प्रवासांची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशी वगार्तून समाधान व्यक्त होत आहे.महापौरांनी केला पहिला प्रवासमहापौर सरिता मोरे, राहुल चव्हाण, सुरेखा शहा, संजय सरनाईक आदींनी पन्हाळा आणि जोतिबाकडे जाणाऱ्या केएमटी बसमधून प्रथम प्रवास केला. याशिवाय पन्हाळा आणि जोतिबा येथील समारंभालाही हजेरी लावली.

टॅग्स :tourismपर्यटनMuncipal Corporationनगर पालिकाJyotiba Templeजोतिबा