शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
5
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
6
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
7
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
8
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
9
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
10
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
11
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
12
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
13
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
14
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
15
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
16
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
17
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
18
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
19
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
20
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश

रोडवरचे राजे, रोडरोमिओंनीच गाजे

By admin | Updated: August 2, 2015 23:34 IST

‘‘अ रोमिओ जुलिएट’’.वाढते ‘रोड-रोमिओंचे’ प्रमाण या सर्व गोष्टींची मजा हरवून बसले आहेत. खूप प्रश्न येतात अशावेळी मनात.

तेरे नखरे है कमाल.... उमर है सोला साल... गं पोरी जरा हळू हळू हळू हळू चाल...असं म्हणत ते चार-चौघे त्या दोन मुलींच्या मागून झामकन पुढे जातात. त्या बिचाऱ्या मात्र घाबरत आपल्या वाटेने झपाझप चालत असताना पुन्हा समोरून गाड्या येतात.व्हाट इस युअर मोबाईल नंबर... करू क्या डाइल नंबर...होगा फिर आना जाना... दे दे कोई ईझी नंबर...असं ऐकल्यावर पुन्हा त्या घाबरतात, बावरतात. ती मुलं मग त्यांचा हिरमुसलेला चेहरा पाहून एकमेकांना टाळ््या देत स्वत:चं मनोरंजन करून घेतात. यांच्याकडं पाहिलं तर, मस्तपैकी स्टाईलमध्ये हातात नवीकोरी गाडी धरायची, समविचारी टोळकी जमवायची. जमवायची कशाला? ती सोबत असतातच, आणि मिळून सुरू करायचा ‘रोड रोमिओचा जलवा.’ सोबत गाडीच्या धुरांची कोंडाळ हवेत सोडायची. त्या धुरात मग ते सारेच हरवतात आणि आपापल्या परीनं त्या भावनांचं मूल्यमापनही करतात.कोणत्याही देशाच्या प्रगतीत तेथील तरुणांचं योगदान महत्त्वाचं आणि निर्णायक असतं. पण आपल्या इथली तरुणाई? सिनेमातले ‘हिरो-हिरोईन’ ज्यांना भारतीय तरुण पिढी आपला आदर्श मानते, त्यांच्याच पावलांवर पाऊ ल टाकून, त्याचं अनुकरण करून अनेक पिढ्या या ‘रोड-रोमिओ’चे दिवाने झाले आहेत.आमच्याही कॉलेज लाईफमध्ये अशा सगळ््या गोष्टी व्हायच्या. पण त्यात टपोरीपणा नसायचा. पर सामने वो आती हैं, सासें ही अटकती हैं...और ये जुबान जाती हैं फिसल...अगदी असंच तेव्हा मुलांच्या बाबतीत व्हायचं. त्यांच्या मनात मुलींबद्दल आदरयुक्त भीती असायची. तो आपल्यामागे आहे, हे तिलाही पक्कं माहिती असायचं. पण, मनात भीतीऐवजी, तो समोर येऊ न कधी आपल्याशी बोलतो याची तिला ओढ असायची, आणि बघता बघता एकदा तसा क्षण येतोच. त्याचं मन आतल्या आत धपापलेलं असतं, घाम फुटलेला असतो, डोळ्यांसमोर अंधारी तेवढी यायची राहिलेली असते. तिच्याकडून ‘‘नाही’’ असे शब्द कानावर पडू नयेत म्हणून तो देवाचा धावा करत असतो.वो ना कहे तो खुदखुशी ही कर जाऊंगा मैं यारो...वो हा कहे तो खुशिसेही मर जाऊंगा मैं यारो...अशी त्याची अवस्था असताना, समोरून उत्तर येतं. ‘‘यस!’’ अशावेळी काय करायचं आणि काय नाही हे दोघांनाही समजत नाही. ती दोघे एकमेकांकडे बघून फक्त हसत असतात. ती लाजते. तो प्रचंड खूश होतो. पण तेवढंच आणि तितकंच. त्यांच्या आयुष्यात आता ते एकटे नसतात. त्यांना मिळालेले असतात पार्टनर्स. सच्चे साथी. ‘‘अ रोमिओ जुलिएट’’.वाढते ‘रोड-रोमिओंचे’ प्रमाण या सर्व गोष्टींची मजा हरवून बसले आहेत. खूप प्रश्न येतात अशावेळी मनात. आयुष्यातील उमेदीची वर्षे असं ‘रोड-रोमिओ’मध्ये कशी धुरासारखी हवेत उडून जातात याबद्दल आजच्या तरुणांना माहिती नाही असं थोडीच आहे? पण त्यांच्या सिनिअर आदर्शांनीच तसं उदाहरण त्यांच्यासमोर ठेवले असेल तर? शिवाय तारुण्यातील बेदरकार, बेफिकीरही त्याला कारणीभूत असेल तर? म्हणूनच अशा प्रश्नांचा गुंता आणखी वाढण्याच्या आत आपल्या मुलांना विश्वासात घ्या. भले ते रोड-रोमिओ असो अथवा नसो. सांगा त्यांना, की मुलांनो, सगळ्या तुटलेल्या तारा, गैरसमजुतीचे डाग, आमच्या मनात साचलेली जळमट आणि इतरांच्या मनात रुतलेली, खुपलेली काही तिखटजाळ शब्द, तुमच्या वागण्याने तयार झालेली बर-वाईट मतं पुसून टाकतो आम्ही. - सुप्रिया ढपाले