शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा पुतळा घडविणारे खेडकर

By admin | Updated: August 14, 2016 01:03 IST

शिवाजी विद्यापीठात भव्य पुतळा : महाराजांच्या पुतळ्यांमुळे राज्यभर ओळख

कोल्हापूर : युगपुरुष शिवाजी महाराजांचे नाव ऐकले तरी मान अभिमानाने उंचावते, ज्यांच्या नावाने आपले विद्यापीठ प्रस्थापित झाले आहे, त्या छत्रपती शिवरायांचा एक पुतळा शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात असावा; त्यांच्या ठायी नतमस्तक होऊनच येथे प्रवेश व्हावा, अशी शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला मूर्त स्वरूप दिले ते शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी. ऊर्जामयी युगपुरुषाचे स्फुल्लिंग चेतविणारे हे स्मारक कोल्हापूरचे वैशिष्ट्य बनले आहे. या पुतळ्यानंतर खऱ्या अर्थाने बी. आर. खेडकर यांची ‘शिवाजी महाराजांचे शिल्प घडविणारे कलाकार’ अशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांंचे अनेक पुतळे बनविले. या पुतळ्याच्या रूपाने त्यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत.पुतळा उभारणीसाठी अप्पासाहेब पवार यांनी १९७० मध्ये वृत्तपत्रांतून जाहीर प्रकटन करून पुतळ्याची मॉडेल्स मागविली. त्यातून पुण्यातील बी. आर. खेडकर यांचे मॉडेल पसंत करून काम त्यांच्याकडे सोपविले. त्यावेळी पुतळ्याची किंमत ६५ हजार रुपये ठरली. छत्रपती शिवाजी महाराजांंचा अश्वारूढ पुतळा बनविण्यासाठी खेडकर यांनी खूप अभ्यास केला. यासाठी ते पुण्यातील रेसकोर्सवर घोडे पाहण्यासाठी जात आणि घोडा कसा धावतो, थांबतो याचे बारकाईने निरीक्षण करीत. तसेच शिवरायांचा चेहरा, त्यांची आभूषणे, पोशाख, त्यांचा लगाम खेचून उभा केलेला घोडा, आदींबाबत अभ्यास केल्यानंतर १९७१ मध्ये पुतळ्याचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी स्टुडिओमध्ये उमदा घोडा आणला. होता. तीन वर्षांत त्यांनी पुतळा साकारला.छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आहे. तो ब्रॉँझमध्ये बनविण्यात आला असून, त्याची उंची १८ फूट आणि वजन आठ टन आहे. जमिनीपासून त्याची उंची १८ फूट ६ इंच आहे. पुतळा आणि चौथऱ्याची एकूण उंची २६ फूट ६ इंच असून, घोड्याची लांबी २० फूट आहे. त्या काळी अठरा फूट उंचीचा हा पुतळा पुण्यातून कोल्हापुरात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठात पुतळा जोडण्याचे ठरले. त्यानुसार विद्यापीठात दोन महिने राहून खेडकर यांनी पुतळा जोडण्याचे काम केले. चबुतऱ्याचे काम कांचीपुरम्मधील डॉ. अमरेंद्रकुमार यांनी पूर्ण केले. पुतळ्याचे अनावरण १ डिसेंबर १९७४ रोजी तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, आदींच्या उपस्थितीत झाला. या कलाकृतीनंतर शिल्पकार खेडकर यांचे नाव झाले. पुढे विद्यापीठाने त्यांचा गौरव केला. त्यानंतर त्यांनी देशभरात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे साकारले. याशिवाय त्यांनी स्टॅँड परिसरातील राजीव गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील यांचाही पुतळा साकारला. स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका तृप्ती पुरेकर या त्यांच्या कन्या होत. ( प्रतिनिधी)शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या निधनामुळे एक महान कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या रूपात खेडकर यांच्या स्मृती विद्यापीठ चिरंतन जपेल. हा पुतळा भारतीय शिल्पकलेचा एक अत्युत्तम नमुना असून, तो भावी पिढीला प्रेरणा देत राहील. - डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ