सद्य:स्थितीत आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (पुणे) यांच्या २६ जुलै ,२०१२ च्या महाराष्ट्र्र शासनास सादर केलेल्या शिफारशीनुसार संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आदिवासी बाह्य उपयोजना क्षेत्रात येतो आणि कोल्हापूर जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण अल्प आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेचे लाभ पोहोचविण्याकरिता कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, घोडेगाव (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे कार्यरत असून या कार्यालयाकडून पात्र आदिवासी लाभार्थी शोधमोहीम राबविण्यात आली. २०१९-२०२० या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेकरिता आदिवासी आश्रमशाळा कोतेचे मुख्याध्यापक पी बी पाटील यांनी जिल्हा समन्वयक तर श्री मगदूम (गडहिंग्लज) , श्रीमती भाग्यश्री जाधव (चंदगड) , श्री. पाटील (हातकणंगले) , शिरोळ ( ) , करवीर ( ) यांनी खावटी योजनेचे तालुका सचिव म्हणून काम पाहिले. याकामी भाग्यश्री जाधव आण्णासाहेब शिरगावे , बसाप्पा गुडशी , संजय गोणी सर्व (गडहिंग्लज) ,महादेव व्हकळी , बाळकृष्ण पाटील, गंगाराम डांगे सर्व (चंदगड) यांचे सहकार्य लाभले.
सर्वेक्षणाची मुदत ३० नोव्हेंबरला संपली असून चंदगड , गडहिंग्लज, करवीर, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांतून ३५० पात्र आदिवासी निवडण्यात आले आहेत. यामध्ये कोळी महादेव जमातींच्या लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे . मुत्नाळ (गडहिंग्लज), कामेवाडी (चंदगड) , शिरोळ, हातकणंगले येथे आदिवासी पाड्यावर स्थानिक आदिवासी बांधवांकडून सर्वेक्षणासाठी आलेल्या सचिवांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
चौकट:--
"आदिवासी विकास विभाग ,महाराष्ट्र्र शासन यांच्याकडून राबविण्यात आलेल्या या सर्वेक्षणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आदिवासी कोळी महादेव जमातीचे लोक रहात नाहीत या प्रशासनाच्या भूमिकेला पूर्णविराम मिळाला. पात्र आदिवासी लाभार्थी संख्या ही जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे . त्यामुळे येथून पुढील काळात तरी जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका बदलून स्थानिक आदिवासींना त्यांचे घटनात्मक हक्क देऊन राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत."
- प्रा बसवंत मल्लापा पाटील , जिल्हाध्यक्ष ,अखिल भारतीय कोळी समाज तथा
फोटो ओळी:---कामेवाडी (ता. चंदगड) येथे गावठी अनुदान योजनेच्या सचिव भाग्यश्री जाधव यांचा स्वागत सत्कार करताना आदिवासीबांधव