शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खाटांगळेत भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 18:51 IST

कोल्हापूर : खाटांगळे (ता. करवीर) येथे भुरट्या चोरट्यांनी गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. किराणा दुकानातील रोकड ते दुचाकीतील पेट्रोल चोरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. नोकरी नाही, की घरातून पैसे दिले जात नाहीत; परंतु व्यसनाच्या आहारी आणि ऐशारामात जगण्याची शरीराला लागलेली सवय सहजासहजी बंद करता येत नाही. त्यामुळे काही टोळक्यांकडून या चोºया केल्या जात असल्याची चर्चा आहे. या भुरट्या चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

ठळक मुद्देचैनीसाठी काही टोळक्यांकडून कृत्य दुचाकीतील पेट्रोलवरही सपाटा

कोल्हापूर : खाटांगळे (ता. करवीर) येथे भुरट्या चोरट्यांनी गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. किराणा दुकानातील रोकड ते दुचाकीतील पेट्रोल चोरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. नोकरी नाही, की घरातून पैसे दिले जात नाहीत; परंतु व्यसनाच्या आहारी आणि ऐशारामात जगण्याची शरीराला लागलेली सवय सहजासहजी बंद करता येत नाही. त्यामुळे काही टोळक्यांकडून या चोºया केल्या जात असल्याची चर्चा आहे. या भुरट्या चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तीन ते चार हजार लोकवस्ती असलेले खाटांगळे गाव सधन आहे. येथील एका किराणा दुकानाच्या छतावरील कौले काढून चोरट्यांनी रोकड चोरुन नेण्याचा प्रयत्न पाच ते सहावेळा केला आहे. नेहमीप्रमाणे दुकानमालक रविवारी (दि. ३०) सकाळी सातच्या सुमारास दुकानात आले असता पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले, तर पोटमाळ्यावरील छतावरील कौले बाजूला सरकलेली दिसली. दुकानातील किरकोळ स्वरूपातील रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी दूध संस्थेसह एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचा बंगला फोडून चोरी झाली होती.

घरासमोर, पार्किंग केलेल्या मोटारसायकलच्या पेट्रोल टाक्या रातोरात रिकाम्या केल्या जात आहेत. पैसा कमविण्याची अक्कल नाही, घरांतून पैसे दिले जात नाहीत, तर आपलं चालणार कसं म्हणून काही टोळक्यांनी चोरीचा सपाटा लावला आहे. स्वत:च्या गाडीत चोरीचे पेट्रोल घालून दुसºयांना कमी दरात विकत देण्यामध्येही ते माहीर आहेत. दमडीही न मिळविता किमती पोशाख, डोळ्यावर गॉगल व दिमतीला मोटारसायकल अशा रुबाबात नेहमी तोंडात मावा किंवा गुटखा चघळत बिनदिक्कतपणे चोरटे फिरत असल्याची चर्चा आहे. 

नागरिकांना कामाच्या ठिकाणी मोटारसायकलवरून जावे लागते. त्यामुळे त्यांना नेहमी गाडीमध्ये पुरेसे पेट्रोल ठेवावे लागते. बहुतांशी लोक पगार झाला की, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलची टाकी फुल्ल करतात. हे चोरट्यांना चांगलेच माहीत असते. आपल्या गल्लीत कोण राहते. कोणाच्या मोटारसायकलीमध्ये पेट्रोलचा साठा जास्त असतो. गाडी फुल्ल केली की, त्या रात्री टाकी रिकामी करण्यासाठी ते दिवसभर फिल्डिंग लावतात. रात्री सर्वजण झोपलेत का याचा अंदाज घेतात. मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास सर्वत्र स्मशान शांतता असते अशावेळी हे टोळके चोºया करते.