शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Lok Sabha Election 2019 ‘ध्यानात ठेवून’ आज शरद पवार बोलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:30 IST

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष ...

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होत आहे. परवाच्या दौऱ्यात त्यांनी सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय’ यावर ‘तुमचं ठरलंय, तर आम्हीबी ध्यानात ठेवलंय’ असे उत्तर देऊन इशारा दिला होता. त्यामुळे आजच्या सभेत पवार ‘ध्यानात ठेवून’च बोलणार असल्याने सभेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पाचव्यांदा कोल्हापुरात येत आहेत. धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी ते आज सायंकाळी पुण्याहून थेट कोल्हापुरात येणार आहेत. सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानात सभेला मार्गदर्शन करणार आहेत. आतापर्यंत कॉँगेसचा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एकही नेता कोल्हापुरात प्रचारासाठी आलेला नाही; पण आजच्या सभेला काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल येणार आहेत.पाचव्यांदा कोल्हापुरात : निवडणूक गांभीर्यानेकोल्हापूर : स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही उमेदवारी दिल्याने राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यापासून आतापर्यंत ते पाचवेळा कोल्हापुरात आले आहेत. मागील निवडणुकांचा अंदाज घेतला तर पवार यांनी फार तर एखादी सभा आणि एकवेळा गाठीभेटीचा कार्यक्रम घेतला होता. मागील, २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादी व कॉँग्रेसमधून महाडिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रह राहिला. सतेज पाटील यांची नाराजी होती; पण ती दूर करून एकसंधपणे दोन्ही कॉँग्रेसचे नेते राबले; त्यामुळे देशात मोदी लाट असतानाही धनंजय महाडिक हे कोल्हापुरात ती परतवून लावण्यात यशस्वी झाले. पाच वर्षांनंतर बºयाच घडामोडी घडल्या. राजकीय सोय म्हणून प्रत्येक वेळेला महादेवराव महाडिक भूमिका घेत गेले आणि त्यांच्यासोबत धनंजय महाडिक यांनाही जाणे क्रमप्राप्त राहिले; त्यामुळे इतर पक्षांतील कार्यकर्ते दुखावलेच; पण राष्टÑवादीचे नेते व कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. त्यातूनच महाडिक यांच्या उमेदवारीला शेवटपर्यंत विरोध झाला. विरोधाचे वातावरण निवळेल, असा अंदाज होता; पण तसे न झाल्याने पवार यांनी दुरुस्त्यांसाठी जोरदार प्रयत्न केले. मुंबईत एक-दोन बैठका घेतल्या, त्याचबरोबर निवडणुकीच्या अगोदर गडहिंग्लज येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांंशी शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. त्यानंतर वातावरण सुधारत नाही म्हटल्यानंतर दोन्ही कॉँग्रेससह मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांचा रामकृष्ण हॉल येथे मेळावा घेतला. मुक्कामास राहून त्यांनी अनेक जोडण्या लावल्या. ७ एप्रिलला कोल्हापुरात आले होते. दोन दिवस ते मुक्कामास राहिले. ‘कोल्हापूर’ मतदारसंघात कोण काय करतो, काय परिस्थिती आहे, याची रोज माहिती त्यांच्यापर्यंत पुरविणारी यंत्रणा कार्यरत आहे. पक्षांतर्गत विरोध असताना आपण उमेदवारी दिल्याने दगाफटका होऊ नये म्हणून ते सतर्क आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक