शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोटजाती बाजूला ठेवा, आरक्षणासाठी एकसंध व्हा

By admin | Updated: June 25, 2017 01:16 IST

निरामहरी रूपनर : धनगर समाज आरक्षण मेळाव्यात शासनावर दबावगट निर्माण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाने एकत्र येऊन आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शासनावर दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. समाजाने हे आरक्षण आताच मिळावे ही भूमिका ठेवली पाहिजे. आता नाही तर पुन्हा कधीही नाही, अशी अवस्था निर्माण झाल्याने समाजातील सर्व पोटजाती विसर्जित करून फक्त धनगर हीच जात मानून एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष आमदार रामहरी रूपनर यांनी सांगितले.धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच याबाबत समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणीत मल्हार सेना व युवक संघटनेच्या वतीने धनगर आरक्षण मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी आमदार रूपनर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे हे होते.आमदार रूपनर म्हणाले, धनगर समाजाची २७ पोटजातींमध्ये विभागलेली ताकद फक्त धनगर समाजाच्या नावाखाली एकत्र यावी. बारामतीत समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला होता. त्यामुळे आरक्षण मिळू शकले नाही. आता आरक्षण मिळविण्यासाठी शासनावर दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. निवडणुका नजीक आल्या आहेत. त्यासाठी राज्यभरात असणाऱ्या एकूण १४ टक्के समाजाने एकसंध राहून लढा निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.बबनराव रानगे म्हणाले, सर्वच पक्षांच्या सरकारांनी धनगर समाजाला फसविले आहे. आता समाजाने एकसंध होऊन आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही. त्यासाठी सर्व पोटजाती बाजूला ठेवून एकसंध व्हा.अहिल्यादेवी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पुष्पाताई गुलवाडे म्हणाल्या, भविष्यात आपल्या मुलाबाळांचा विकास करण्यासाठी आरक्षणाच्या लढाईत रस्त्यावर उतरावे लागेल. बारामतीत आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजाला शेळी-मेंढीप्रमाणे समजल्याने समाज त्यांना योग्य वेळी खाली खेचेल, असाही इशारा त्यांनी दिला. महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे यांनी स्वागत केले. नूतन नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले; तर मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश पुजारी, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, आदींनी आपले विचार मांडले. यावेळी माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, नगरसेवक राजसिंह शेळके, मल्लू खोत, बापूसाहेब ठोंबरे, राजू दळवाई, कमलाकर जानकर, बाजीराव शेळके, प्रल्हाद देबाजे, बाळासाहेब दार्इंगडे, शहाजी सिद्ध, बाबूराव बोडके, नाना पुजारी, आदी उपस्थित होते.सत्तास्थाने मिळाल्यानंतर काहींना समाजाचा विसरधनगर समाजातील काही प्रवृत्ती आंदोलनाच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा करतात; पण सत्तास्थाने मिळाल्यानंतर त्यांना समाजाचा विसर पडतो, अशी टीका कोणाचेही नाव न घेता करून आमदार रूपनर यांनी, अशा प्रवृत्तींना समाजाने वेळीच ओळखून बाजूला सारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.