शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे हक्क, अधिकार अबाधित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरालगतच्या ४२ गावांतील ग्रामपंचायतींचे हक्क व अधिकार अबाधित राहणार असतील आणि ग्रामीण भागातील विकासासाठी हजारो कोटींचा निधी मिळणार असेल तर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी बुधवारी प्राधिकरणाच्या निर्णयावर दिली. २४ गावांचा समावेश अनपेक्षितपणे करण्यात आला असून,हा ग्रामस्थांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरालगतच्या ४२ गावांतील ग्रामपंचायतींचे हक्क व अधिकार अबाधित राहणार असतील आणि ग्रामीण भागातील विकासासाठी हजारो कोटींचा निधी मिळणार असेल तर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी बुधवारी प्राधिकरणाच्या निर्णयावर दिली. २४ गावांचा समावेश अनपेक्षितपणे करण्यात आला असून,हा ग्रामस्थांवर अन्याय आहे. त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर शहराच्या तसेच आसपासच्या ग्रामीण भागाचा विकास झालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. सध्या असलेल्या ग्रामपंचायतींचे अधिकार तसेच पाणीपट्टी, घरफाळा वसुलीचे अधिकार, १४ व्या वित्त आयोगातून मिळणारा निधी तसेच अन्य शासकीय निधीला बाधा येता कामा नये. ज्या उद्देशाने प्राधीकरण स्थापन केले जात आहे तो सफल होणार असेल तर आमचा त्याला पाठिंबा राहील; परंतु ग्रामपंचायतींचे हक्क व अधिकार संपुष्टात येणार असतील तर मात्र त्याला विरोध राहील. अधिकृत शासकीय अधिसूचना आल्यानंतर त्यावर आम्ही आमची पुढील भूमिका ठरविणार आहोत. येत्या चार दिवसांत त्यासाठी बैठकघेतली जाईल, असे आमदार नरके यांनी सांगितले.२४ गावांचा अनपेक्षित समावेशझाला आहे. हा त्यांच्यावर अन्यायहोईल. त्यांना प्राधिकरणाची पुसटशीही कल्पना नाही. कारण या गावांतील लोकप्रतिनिधींशी यापूर्वी सरकारने चर्चाच केलेली नाही. त्यांना विश्वासात न घेता जर निर्णय घेतला तर लोकशाहीलाही बाधा आणल्यासारखे होईल. या ग्रामस्थांशीही लवकरच चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.क्षेत्र विकास प्राधिकरणाचीकर्तव्य व जबाबदाºयाविकासाच्या योजना तयार करणे. विकासावर नियंत्रण ठेवणे. जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. विकास परवानगी अनुज्ञेय करणे. विकासकामे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या व्यक्ती / संस्थांबरोबर करार, कंत्राट करणे. प्राधिकरणाच्या क्षेत्रातील स्थावर व जंगम मालमत्ता संपादित करून त्याची योग्य व्यवस्था व व विकास करणे.क्षेत्र विकास प्राधिकरणाचे फायदेनगररचना विभागाच्या योजनेप्रमाणे विकास होईल. जनतेला मूलभूत सेवा-सुविधा मिळतील. प्रत्येक अंतिम भूखंडाला पोहोच रस्त्यांची उपलब्धता होईल. जमीन मूल्यांमध्ये अनेक पटीने वाढ होईल. पालकमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्यामुळे निर्णय प्रक्रिया तसेच अंमलबजावणी जलदगतीने होईल. सरकारकडून निधी उपलब्ध होईल. निधीची कमतरता राहणार नाही. ग्रामीण व शहरी भागाचा एकसारखा विकास होण्यास मदत होणार आहे.क्षेत्र विकास प्राधिकरणाची रचना१ जिल्ह्याचे पालक मंत्री हे क्षेत्र विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील .२जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापालिकेचे महापौर, पंचायत समितीचे सभापती, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता, उपसंचालक भूमी अभिलेखचे उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपसंचालक नगररचना यांचा समावेश असेल.३प्राधिकरण रचनेत विधानसभा व विधान परिषद यांचा समावेश करण्याची शिफारस तत्कालिन जिल्हाधिकाºयांनी सरकारला केली आहे.