शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानासाठी जिज्ञासावृत्ती जागृत ठेवा:विलास पाटील - ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:03 IST

कोल्हापूर : चांगल्या गुणांसह मुलांनी आपल्यातील जिज्ञासावृत्ती जागृत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला प्रश्न पडलाच पाहिजे, हे असे का? कारण जिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ आहे

ठळक मुद्देसंपत्तीपेक्षा विद्वत्तेला सलाम केला जातोअंत:प्रेरणा जागी झाली तरच योग्य शोध लागतील.

कोल्हापूर : चांगल्या गुणांसह मुलांनी आपल्यातील जिज्ञासावृत्ती जागृत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला प्रश्न पडलाच पाहिजे, हे असे का? कारण जिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ आहे. त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी तुमच्यातील जिज्ञासावृत्ती जागृत करा, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले.

शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आयोजित ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहारहोते.

डॉ. पाटील म्हणाले, आजच्या युगात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. संपत्तीपेक्षा विद्वत्तेला सलाम केला जातो. विज्ञानामुळे माणूस जवळ आला; पण माणूसपण दूर गेले आहे. त्यामुळे विज्ञानाला धर्माची जोड देणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंत:प्रेरणा जागृत करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या मनात सतत नवीन शिकण्याचा ध्यास असला पाहिजे. अंत:प्रेरणा जागी झाली तरच योग्य शोध लागतील.

यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा ‘शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रदर्शनात प्राथमिक शाळेतील १३५, तर माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश आहे. तसेच शिक्षकांच्या १३ उपकरणांचा सहभाग आहे. सौरऊर्जेवर चालणारी गाडी, ध्वनिप्रदूषण रोखणारा जॅमर, सोलर हिटर अशा विविध प्रकाराची उपकरणे यामध्ये मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन गुरुवार (दि. १४)पर्यंत खुले राहणार आहे.भक्ती फट्टे, रुपाली नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. व्ही. कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर एस. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपाली सावंत यांनी आभार मानले.

यावेळी गुजराती मित्र मंडळाचे चेअरमन जसवंतभाई शहा, विज्ञान समितीचे अध्यक्ष एम. एस. शिंदे, विज्ञान समिती सचिव प्रकाश सुतार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा प्रदर्शनाचा विषयकोल्हापूर शहरातील विविध प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून १३५, तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून १३० उपकरणांचा समावेशशिक्षकांच्या १३ उपकरणांचा सहभागसौरऊर्जेवर चालणारी गाडी, ध्वनिप्रदूषण रोखणारा जॅमर, सोलर हिटर अशा विविध प्रकाराची उपकरणेकोल्हापुरातील शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे मंगळवारी ४३ व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रकाश सुतार, आर. व्ही. कांबळे, दीपाली सावंत, एस. एस. म्हातुगडे, एम. एस. शिंदे उपस्थित होते.