सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणे यांचा मेळाव्यात निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड: आगामी होऊ घातलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक राधानगरी तालुक्यातून लढविणार असल्याचा निर्धार सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणे नऊनंबर येथील मेळाव्यात केला. गट-तट बाजूला ठेवून समन्वयाच्या भावनेतून तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळीनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिवांश मल्टीपर्पज व्हॉल नऊनंबर धामोड (ता.राधानगरी ) येथे आयोजित केलेल्या ठराव धारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्यास राजाराम कारखान्याचे संचालक के.पी. चरापले,माजी व्हाईस चेअरमन एल. एस. पाटील, एम.डी. खडके, बुरंबाळीचे माजी सरपंच एकनाथ चौगले, महिपती लाड,आनंदा टेपूगडे, डी.जी. नलवडे, व्ही.डी. चौगले, लक्ष्मण खोत, शांताराम पाटील, आनंदा जाधव, बाळासो कुरणे , के.आर. पोतदार, दगडू चौगले, शंकर जाधव, प्रभाकर चौगले, आनंदा धनवडे, सदाशिव खोत, सुभाष गुरव, मारुती तामकर आदीसह ठरावधारक व तुळशी - धामणी खोऱ्यातील नवणे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी -नऊनंबर (ता .राधानगरी) येथील ठराव धारकांच्या बैठकीत बोलताना बाळासाहेब नवणे व समोर उपास्थित ठरावधारक व कार्यकर्ते.