शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटातही कर्नाटकी बेंदूर दणक्यात, पंचगंगा नदीघाट गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:04 IST

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण कोरोनाच्या सावटातही रविवारी सीमाभागातील गावांसह जिल्ह्यात दणक्यात साजरा झाला. घरोघरी बैलांची पूजाअर्चा करून त्यांची ओवाळणी झाली. कोरोनामुळे कर तोडण्याच्या विधीवर मर्यादा आल्या तरी उत्साह मात्र कायम होता. पंचगंगा नदीघाट तर ढोल, ताशा, हलग्यांच्या दणदणाटात दुमदुमून गेला.

ठळक मुद्देकोरोनाच्या सावटातही कर्नाटकी बेंदूर दणक्यातपंचगंगा नदीघाट गजबजला

कोल्हापूर : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण कोरोनाच्या सावटातही रविवारी सीमाभागातील गावांसह जिल्ह्यात दणक्यात साजरा झाला. घरोघरी बैलांची पूजाअर्चा करून त्यांची ओवाळणी झाली. कोरोनामुळे कर तोडण्याच्या विधीवर मर्यादा आल्या तरी उत्साह मात्र कायम होता. पंचगंगा नदीघाट तर ढोल, ताशा, हलग्यांच्या दणदणाटात दुमदुमून गेला.जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या गावांमध्ये शनिवारी (दि. ६) कर्नाटकी बेंदूर साजरा केला गेला. दरवर्षी अगदी जल्लोषात होणाऱ्या या सणावर यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मर्यादा आल्या होत्या. घरगुती पद्धतीनेच सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते; पण प्रत्यक्षात रविवारी त्याचे पालन झाले नसल्याचेच दिसले. कोरोना विसरून शहरात सर्वत्र सजवलेल्या बैलांसह फेरफटका मारून सणाचा आनंद घेतला.पंचगंगा नदीघाटावर वाजतगाजतच बैलांचे आगमन होत होते. नदीपात्रात यथेच्छ अंघोळ घातल्यानंतर त्यांचा घाटावर येऊन साजशृंगार केला जात होता. नवी वेसण, घुंगरू, गोंडे, झुली घालून बैलांना नटवले जात होते. शिंगांसह अंगावरही रंगाने नक्षीकाम केले जात होते. या नटवण्यामध्ये तरुणाई आणि बच्चेकंपनीचाच सहभाग जास्त दिसत होता. नटवून झाल्यानंतर बैलांसह हलगी व ताशाच्या गजरात तरुणाईने घाटावरच ठेका धरला.अडीच महिन्यांनी वाजंत्र्यांची कमाईलॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्व सण, कार्यक्रम बंद झाल्याने अडीच महिन्यांपासूून वाजंत्र्यांचे बाहेर पडणेही थांबले. बेंदराच्या निमित्ताने हलगी, ताशा कडाडल्याने ३०० रुपये का असेना; पण कमाई सुरू झाल्याचा आनंद वाजंत्र्याच्या चेहऱ्यावरून ओंसंडून वाहताना दिसत होता. वाजंत्री असलेल्या अतुल घडशी या तरुणाने तर हलगीलाच सलाम करून कामाला सुरुवात केली.बेंदराच्या या उत्साहात बैलांच्या अंघोळीपासून ते त्यांना सजवण्यापर्यंतची सर्व कामे तरुणाईने आपल्या हातात घेतल्याचे सुखद चित्र दिसत असतानाच याच तरुणाईने कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणाच्या भावनेलाच गालबोट लावण्याचेही काम केले.

बैलासह सेल्फी, व्हिडीओ इथेपर्यंत ठीक होते; पण काही अतिउत्साही तरुणांनी बैलांसमोर छत्री धरून त्यांना उसकवण्याचा प्रयत्न केला. यातून बैल उधळला. दुचाकीही खाली पडल्या. एक लहान मुलगाही खाली पडला. सुदैवाने एकाने त्याला उचलून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. बैलांच्या डोळ्यांसमोर गुलाल फेकला जात होता. त्यांच्या मागे दुचाकी लावून त्यांना जोरदार पळवलेही जात होते. यातून विकृतीच दिसून आली. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर