शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक एस.टी. महामंडळाचा संप : भुर्दंड प्रवाशांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 10:27 IST

कोल्हापूर : उत्तर व दक्षिण कर्नाटक राज्य परिवहन महामार्ग महामंडळाच्या चालक-वाहकांनी महामंडळाऐवजी शासनाकडे वर्ग करा, या मागणीसह अन्य प्रलंबित ...

ठळक मुद्देकर्नाटक एस.टी. महामंडळाचा संप : भुर्दंड प्रवाशांना बेळगावसाठी ८०० ते हजार, तर निपाणीसाठी १०० ते १५० रुपये प्रतिमाणसी आकार

कोल्हापूर : उत्तर व दक्षिण कर्नाटक राज्य परिवहन महामार्ग महामंडळाच्या चालक-वाहकांनी महामंडळाऐवजी शासनाकडे वर्ग करा, या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापूरहून निपाणी, संकेश्वर, बेळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे प्रतिमाणसी १००, २०० आणि १००० असा भुर्दंड पडत आहे.कर्नाटक एस.टी. महामंडळातील चालक-वाहकांनी त्यांना महामंडळाऐवजी शासनाकडे वर्ग करा, म्हणून गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

यात कोल्हापूरहून या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या रोज २५ एस.टी. बसेस रवाना होतात. मात्र, तेथील संपाच्या पार्श्वभूमीवर या बसेसचे नुकसान होऊ नये म्हणून त्या बंद केल्या आहेत.

या सर्वांचा परिणाम म्हणून निपाणीसह बेळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्याचा फायदा खासगी वाहनचालक घेऊ लागले आहे. मनमानी कारभारामुळे निपाणीसाठी प्रतिमाणसी १०० ते १५०, संकेश्वरसाठी २०० ते २५० आणि बेळगावसाठी ८०० ते १००० रुपये आकारले जात आहेत.

या अव्वाच्या सव्वा भाडेआकारणीमुळे प्रवासी वर्गाच्या खिशाला मोठा चाट पडत आहे. अशा प्रकारे मनमानी करणाऱ्या वाहनधारकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी संतप्त प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :state transportएसटीbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर