शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींसमोर बोलायला कर्नाटकातील भाजप नेते घाबरतात': सतीश जारकीहोळी यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:26 IST

बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.

ठळक मुद्दे'मोदींसमोर बोलायला कर्नाटकातील नेते घाबरतात'सतीश जारकीहोळी यांचा टोला

बेळगाव : बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समोर पुरग्रस्तांच्या समस्या मांडण्यात कर्नाटक भाजपचे नेते घाबरतात. आम्हाला बोलायला संधी दिल्यास उत्तर कर्नाटकातील पुरग्रस्तांच्या समस्या मांडू असा टोला सतीश जारकीहोळी यांनी लगावला आहे. बेळगावात शुक्रवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतेवेळी बोलत होते.देशात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपा सरकार आहे मात्र कर्नाटकच्या जनतेला याचा काहीही उपयोग झालेला नाही केंद्राकडून पूरग्रस्तांना मदत आणण्यात राज्यातील भाजप नेत्यांना अपयश आले आहे केंद्राने अद्याप एक पैसाही निधी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिलेला नाही असेही ते म्हणाले.भाजपाने बेळगावात अधिवेशन घेऊन दाखवावे असे आवाहन करत हिवाळी अधिवेशन घेण्याचे धाडस कर्नाटक सरकारकडे नाही असा देखील टोला माजी पालकमंत्र्यांनी लगावलाय. आंदोलक पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना घाबरून भाजप सरकारने बेळगावात होणारे अधिवेशन बंगळुरूला स्थलांतरित केला आहे असा आरोप देखील त्यांनी केला.बेळगाव सह उत्तर कर्नाटकात आलेल्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि पूरग्रस्तांना मदत करण्यास कर्नाटक सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात कर्नाटक काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी होतील असेही त्यांनी नमूद केले.

पूरग्रस्तांना वितरण केलेले चेक आणि ठिकाणी बाऊन्स झाले आहेत. घरे बांधण्यासाठी शेड निर्माण करण्यासाठी एनडीआरएफ मार्गसुचीची अडचण येत आहे महसूल मंत्री फक्त बेंगलोर पुरता मर्यादित आहेत अजूनही ते बेंगलोर बाहेर आलेले नाहीत त्यामुळे या पूर् ग्रस्तांना अडचणी येत आहेत असे त्यांनी नमूद केलं.मी सांगेल त्याला गोकाक मधून काँग्रेसचे तिकीट मिळेल आणि मी विरोधी पक्ष नेत्यांच्या स्पर्धेत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केलं. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की 'जे कोणी चुकत आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे'. हेब्बाळकर या चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम आहेत असेही ते म्हणाले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर