शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कर्जतच्या ‘रक्षा’चे मदतकार्य अविस्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:29 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामुळे शिरोली येथे पाणी आल्याने राष्टÑीय महामार्गावरील गेले सात दिवस ठप्प ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापुरामुळे शिरोली येथे पाणी आल्याने राष्टÑीय महामार्गावरील गेले सात दिवस ठप्प असलेली वाहतूक सोमवारी सुरू झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यामध्ये जिल्हा व पोलीस प्रशासनाला मदत करण्याची महत्त्वाची भूमिका कर्जत (जि. रायगड) येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी बजावली. रविवारी (दि. ११) रात्रीपासून या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. महापुरातील कोल्हापूरकरांसाठी काहीतरी करायचं या भावनेतून त्यांनी केलेले काम न विसरण्याजोगे आहे.कर्जतच्या रक्षा सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष व गिर्यारोहक प्रशिक्षक अमित गुरव यांच्या नेतृत्वाखाली पाचजणांचे पथक रविवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. गुरव हे काश्मीरमधील लेह, लडाख गिर्यारोहणाच्या मोहिमेत होते. त्या ठिकाणी त्यांना कोल्हापूर, सांगलीच्या बातम्या पाहायला मिळत होत्या. मन अस्वस्थ होत होते. ते स्वत: आपत्ती व्यवस्थापनाचेही प्रशिक्षक असल्याने त्यांच्यातील मदतकार्यातील जवान त्यांना स्वस्थ बसू देईना. ते तीन दिवसांपूर्वी कर्जतला आले. तब्येत बिघडल्याने त्यांनी थोडा आराम केला. ‘रक्षा’ या आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या संस्थेतील आपल्या सहकाऱ्यांसमवेत रविवारी रात्री थेट कोल्हापूर गाठले. येताना त्यांनी चादर, कपडे, साड्या, पाणी असे साहित्य भरलेले कर्जत नगरपालिकेचे तीन ट्रक व तहसील कार्यालयाचे दोन ट्रक आणले. कोल्हापुरात आल्यानंतर हे ट्रक जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देऊन ते शिरोळकडे रवाना करण्यात आले. शिरोळ येथे जाऊनप्रत्यक्ष बचावकार्यात सहभागघ्यायचा की येथे थांबून अन्य काही मदतकार्य करायचे? या विचारात असलेल्या या पथकाला प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात काम करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार गुरव यांच्या नेतृत्वाखालील तुषार वैद्य, योगेश परदेशी, सुमित गुरव, संकेत कडू या स्वयंसेवकांनी रविवारी रात्रीपासून पोलिसांसोबत या कामाला सुरुवात केली. वाहतूक पूर्ववत सुरळीत होत नाही, तोपर्यंत कोल्हापूर न सोडण्याचा निर्धार करत, झपाटून काम केले. शिरोलीपासून तावडे हॉटेलपर्यंत ठिकठिकाणी थांबून वाहनधारकांना योग्य त्या सूचना देऊन वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत राहील, याची दक्षता घेतली. पोलिसांसोबत राहून त्यांना हातभार लावण्याचे काम त्यांनी केले. निव्वळ महापुरात सापडलेल्या कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी इतक्या लांबून धावून आलेल्या स्वयंसेवकांच्या कार्याला पोलिसांनीही दाद दिली.