शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यात काेरेंचा, तर राधानगरीत ‘ए. वाय.’ यांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांचा वरचष्मा राहिला असला तरी बहुतांशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांचा वरचष्मा राहिला असला तरी बहुतांशी नेत्यांनी आपापले गड शाबूत राखले आहेत. पन्हाळ्यात आमदार विनय कोरे यांनी २५ ग्रामपंचायतींवर जनसुराज्य पक्षाचा झेंडा फडकावला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल, पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा व कोल्हापूर दक्षिण, आमदार प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड मध्ये, तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी राधानगरीमध्ये दबदबा कायम राखला. चंदगडमध्ये माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शिवाजी पाटील यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले आहे.

विधानसभा व त्यानंतर राज्यात अनपेक्षितपणे उदयास आलेली महाविकास आघाडीनंतरची ही स्थानिक पातळीवरील पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकांना स्थानिक राजकारणाची किनार असली तरी आगामी सर्वच निवडणुकांची पायाभरणी होत असल्याने नेते मंडळींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेप या निवडणुकीत असतो.

कागलमध्ये गटांतर्गत राजकारण असले तरी येथे महाविकास आघाडीचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला. सदस्यांचे बलाबल पाहता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व राहिले. खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गड कायम राखले. करवीरमध्ये आमशी, खुपिरे, कोपार्डेे येथील अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात आमदार पी. एन. पाटील गटाला यश आले. कोगेसह इतर ग्रामपंचायतींवर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी वर्चस्व कायम राखले. कोल्हापूर दक्षिण व गगनबावडा तालुक्यात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपला दबदबा कायम राखला. माजी आमदार अमल महाडिक यांनीही ‘दक्षिण’मधील गडमुडशिंगीसह इतर ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राखली. राधानगरीत आठ ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता हस्तगत करीत ए. वाय. पाटील यांनी पकड घट्ट केली. तालुक्यातील १५९ सदस्यांपैकी १०३ सदस्य त्यांना मानणारे आहेत. भुदरगडमध्ये आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपले गड कायम राखले. शाहूवाडीत माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी १३ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकविला. गडहिंग्लजमध्ये माजी आमदार संध्यादेवी कुपेकर गटाने १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले.

हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे, डॉ. सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, तर शिरोळमध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, उल्हास पाटील यांनी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातूनच यश मिळविले. चंदगडमध्ये भरमूण्णा पाटील, गोपाळराव पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली. आमदार राजेश पाटील यांनीही आपल्या ग्रामपचायती राखल्या आहेत. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून नेत्यांनी यश मिळविले असले तरी पक्षीय पातळीवर जनसुराज्य, शिवसेना व राष्ट्रवादीने भरीव कामगिरी केल्याचे दिसते.

चंदगडमध्ये २० ग्रामपंचायती भाजपकडे

इतर तालुक्यांच्या तुलनेत चंदगडमध्ये भाजपने मुसंडी मारली. तब्बल २० ग्रामपंचायती ताब्यात घेत आपली ताकद दाखवून दिली. सदस्यांच्या तुलनेत १३१ सदस्य भाजप, तर ८७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत.

कोठे काय झाले-

करवीर : काँग्रेस -४, शिवसेना-३, भाजप-३, स्थानिक आघाड्या-

राधानगरी : राष्ट्रवादी -८, काँग्रेस-१, स्थानिक आघाड्या-११

भुदरगड : राष्ट्रवादी - ११, शिवसेना - १२, स्थानिक आघाड्या -१३

हातकणंगले : भाजप-२, शिवसेना - ३, जनसुराज्य -३, आवाडे गट-२, स्थानिक आघाड्या -११

शिरोळ : स्वाभिमानी -१, स्थानिक आघाड्या ३२

पन्हाळा : शिवसेना - ५, जनसुराज्य -२५, स्थानिक आघाड्या- १२

गगनबावडा : काँग्रेस-६, भाजप-२.

शाहूवाडी : शिवसेना -१३, जनसुराज्य -८, स्थानिक आघाड्या -११

कागल : महाविकास आघाडी-१६, फुटीर महाविकास आघाडी-५, स्थानिक आघाड्या- १४

गडहिंग्लज : भाजप -३, राष्ट्रवादी - १५, शिवसेना-३, जनता दल-२

चंदगड : भाजप-२०, राष्ट्रवादी -४, स्थानिक आघाड्या -१७

आजरा : स्थानिक आघाड्या -२१