शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रामाणिक रिक्षाचालकांसाठी वाजले व्हायोलिनचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:35 IST

रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशांशी नाते असते. ते नाते कायम गोड राखण्यासाठी व रिक्षाचालकांना समाजात सन्मान मिळावा, या हेतूने ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या वतीने मंगळवारी दैवज्ञ बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या व्हायोलिनवादनाचा आनंद कोल्हापुरातील अनेक रिक्षाचालकांनी मनमुराद लुटला.

ठळक मुद्देप्रामाणिक रिक्षाचालकांसाठी वाजले व्हायोलिनचे सूरअनाम प्रेम संस्थेचा आगळावेगळा उपक्रम; रिक्षाचालकांचा सन्मान

कोल्हापूर : रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशांशी नाते असते. ते नाते कायम गोड राखण्यासाठी व रिक्षाचालकांना समाजात सन्मान मिळावा, या हेतूने ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या वतीने मंगळवारी दैवज्ञ बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या व्हायोलिनवादनाचा आनंद कोल्हापुरातील अनेक रिक्षाचालकांनी मनमुराद लुटला.अनाम प्रेम संस्थेच्या वतीने दरवर्षी रिक्षाचालकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत मंगळवारी सकाळी व्हायोलिनवादक मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर व शिष्य यश भावसार, गुणवंतसिंग (तबला साथ) यांच्या साथीने ‘इंद्रायणीच्या काठी’ हे भजन, तसेच शुद्ध सारंग हा राग आळवला.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमास शेकडो रिक्षाचालकांनी विशेष उपस्थिती लावली होती. दरम्यान, प्रामाणिक रिक्षाचालक सूर्यकांत हजारे, महेश शेवडे, राजेंद्र शिंदे यांचा सत्कार अनुक्रमे नेमिनाथ चौगुले, राजेंद्र वोरा, एस. आर. कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते झाला.यावेळी राहुल ठाकूर, अतुल ठाकूर, दत्तात्रय केळुस्कर, प्रकाश केळुस्कर, संजय पोवार, नागेश नागवेकर, दीपक कांबळे, शिवाजी चौगुले यांच्यासह मुंबई, कोकणातील अनाम प्रेमी उपस्थित होते. विशेष म्हणजे हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, चेतना अपंगमती, वडगाव कर्णबधिर शाळा, ज्ञानप्रबोधिनी अंध शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

 

टॅग्स :musicसंगीतkolhapurकोल्हापूर